Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad भीषण अपघात : कार अपघातात माजी जि. प. सदस्या ठार , तीन जखमी …दोन्ही ट्रकच्यामध्ये कारचा चुराडा…

Spread the love

कन्नड – चाळीसगाव राष्ट्रीय महामार्गावरील ऑट्रम घाटात सरदार पॉईंटजवळ समोरील ट्रकने अचानक ब्रेक मारल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील माजी जिल्हा परिषद सदस्या यमुनाबाई रामचंद्र पवार (वय ६८) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. कृष्णा संदीप गव्हाणे, अश्विनी कृष्णा गव्हाणे व गौरी कृष्णा गव्हाणे हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना चाळीसगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले.


मालेगाव येथे प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराणाचा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमासाठी यमुनाबाई पवार यांचे बंधू त्यांच्या कुटुंबासोबत जात होते. त्यांनी त्यांची बहीण यमुनाबाई यांना देखील सोबत घेतले. चौघंही मालेगाव येथे शिवपुराण कार्यक्रमाला कारने जात असताना कन्नड येथील ऑट्रम घाटात सरदार पॉईंटजवळ समोरील ट्रकने अचानक ब्रेक मारला. त्यापाठोपाठ चालक कृष्णा यांनी देखील ब्रेक मारला. मात्र, मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने कृष्णा यांच्या कारला धडक दिली आणि कारला पुढे फरफटत नेत कार समोरील ट्रकला धडकली. त्यामुळे कारचा दोन्ही टाकीच्या मध्ये अडकून चिरडल्या गेली आहे.

या भीषण अपघातात यमुनाबाई यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तिघेजण गंभीर जखमी झालेत. भीषण अपघात झाल्याचे पाहून ट्रक चालक फरार झाला. या घटनेची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. मात्र, मृत आणि जखमी गाडीतच अडकले होते. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने वाहने वेगवेगळी केली व अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. जखमींना चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

… हा निर्लज्जपणाचा कळस – अजित पवार आक्रमक


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!