… हा निर्लज्जपणाचा कळस – अजित पवार आक्रमक

अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड कृषी प्रदर्शनासाठी बेकायदेशीर निधी गोळा केल्याचा तसेच गायरान जमीन एका व्यक्तीला विकल्याचा आरोप करत विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी सुप्रिया सुळेंना केलेली शिवागीळ आणि जिल्हाधिकाऱ्यांना मद्यप्राशनासाठी दिलेली ऑफर यावर भाष्य करत आक्रमक भूमिका घेतली आहे.
हिवाळी अधिवेचनाच्या पाचव्या दिवशी विधानसभेत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नागपूर खंडपीठाने कृषीमंत्र्यांविरोधात कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी वाशीम जिल्ह्यातील १५० कोटींची ३७ एकर गायरान जमीन खासगी व्यक्तीला दिली. त्यांनी कायदेशीर बाबींचे उल्लंघन केले आहे. अब्दुल सत्तार यांच्याविरोधात ठोस पुरावे आहेत. त्यांनी पदाचा दुरुपयोग केला आहे. राज्य सरकार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय माहिती असतानाही एका व्यक्तीला फायदा मिळवून देण्यात आला. त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी,” अशी मागणी अजित पवारांनी केली.
सिल्लोड कृषि प्रदर्शनासाठी बेकायदेशीर निधी गोळा केल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला आहे. दरम्यान अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना रोखत नियमाची आठवण करुन दिली. ३५ ची नोटीस दिल्यानंतर हा विषय आणणे योग्य आहे का अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर अजित पवार म्हणाले की मी नियमाप्रमाणे जाण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हीदेखील फडणवीस, शिंदे विरोधी पक्षात असताना हे पाहिले आहे. कोर्टाने ताशेरे ओढलेले असतानाही कृषीमंत्र्यांनी त्यांचे ऐकले नाही. जिल्हाधिकारी, अतिरिक्त मुख्य सचिवांना कळवले नाही. कार्यक्रम शासकीय नसतानाही पत्रिकेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री यांचे फोटो छापले आहेत. दादा भूसे कृषीमंत्री असताना असे कार्यक्रम घेण्यासाठी आम्ही बजेटमध्ये तरतूद केली होती. त्याबद्दल काही दुमत नाही. पण यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे माझ्याकडे ठोस पुरावे आहेत, असेहि अजित पवार यावेळी म्हणाले.
कृषी विभागाला वेठीस धरण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी आम्हाला काही माहिती नसल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील प्रत्येक कृषी दुकानदाराला पाच हजार रुपये वसूल करुन देण्यास सांगितले. हा एक प्रकारचा भ्रष्टाचार नाही का? याकरता मंत्री केले आहे का?,असा थेट सवाल देखील अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. गेल्या सहा महिन्यात त्यांच्याबद्दल सतत काहीतरी घडत आहे. महिला नेत्याला शिवीगाळ करण्यात आली. दारु पिणार का? असे जिल्हाधिकाऱ्यांना विचारतात. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. त्या मंत्रिमंडळात तुम्हीही आहात. तुमच्या ११५ मुळे हे मंत्री झाले आहेत. तुम्हीही तितकेच जबाबदार आहात. तुमच्याकडे फार अपेक्षेने महाराष्ट्र पाहतो. तुम्ही ठरवले तर राजीनामा घेऊ शकता,” असे अजित पवार फडणवीसांना उद्देशून म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना मान खाली घालायला लावेल, इतकी हिंमत कुणाच्या बापात नाही
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055