धक्कादायक महिलेला ६ दिवस बांधून ठेवून सामुहिक बलात्कार
मध्य प्रदेशमध्ये छतरपूर जिल्ह्यात एका महिलेला बांधून ठेवून तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणी मध्य प्रदेश पोलीस दलाकडून चार जनांसह एका महिलेला देखील अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेने मैत्रिणीला तिच्या बहिणीच्या उपचारासाठी तीन लाख रुपये दिले होते. ती रक्कम परत मागण्यासाठी मैत्रिणीकडे गेली तेव्हा तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे.
पीडित महिलेने तिची मैत्रिण सोनाली रैकवार हिला बहिणीच्या उपचारासाठी काही दिवसांपूर्वी तीन लाख रुपये दिले होते. पीडित महिला ही रक्कम परत मागण्यासाठी गेली असता सोनाली रैकवारने तिला घरात बोलावून बांधून ठेवले. पंकज जैन, विजय नायक, गोपाल रैकवार आणि नीरज रैकवार तिथे आधीच होते. या चार जणांनी तब्बल ६ दिवस त्या महिलेवर बलात्कार केला आहे.
महिलेने तिथून सुटून आल्यानंतर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली आहे. ओरछा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या जबाबाच्या आधारावर ओरछा पोलिसांनी चार पुरुष आरोपींना आणि एका महिलेला अटक केली आहे. घटनास्थळाची पाहणी केली जात असून, या प्रकरणाची अधिक तपस सुरु आहे.
भारत जोडो यात्रा थांबवण्याचे आवाहन – आरोग्य मंत्री
News Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055