Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाषेच्या अहंकारातून मातृत्वाचाच खून — मराठी बोलत नसल्याने सहा वर्षांच्या चिमुकलीची आईकडून निर्घृण हत्या

Advertisements
Advertisements
Spread the love

महाराष्ट्रात माणुसकीला हादरवणारी, समाजाला आरसा दाखवणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील कळंबोली येथे एका आईने आपल्या सहा वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा गळा आवळून खून केला. त्या निरागस मुलीचा “गुन्हा” एवढाच होता की तिला मराठी नीट बोलता येत नव्हतं.

Advertisements

सुरुवातीला ‘हार्ट अटॅक’चं नाटक

Advertisements
Advertisements

३० वर्षीय ही महिला कळंबोलीत पती व मुलीसोबत राहत होती. मुलीचा मृत्यू झाल्यानंतर तिने सर्वांना सांगितलं की मुलीला हार्ट अटॅक आला.

पती तिला तात्काळ रुग्णालयात घेऊन गेला. मात्र डॉक्टरांना आणि पोलिसांना मृत्यू संशयास्पद वाटला. त्यामुळे विशेष पोस्टमॉर्टम करण्यात आलं.

पोस्टमॉर्टमने उघड केलं भयाण सत्य

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं की मुलीची श्वासनळी दाबली गेली होती.

यानंतर पालकांची सखोल चौकशी करण्यात आली. तब्बल ६ तासांच्या चौकशीनंतर आईनेच कबूल केलं की तिने आपल्या मुलीचा गळा दाबून खून केला आहे. पोलिसांनी तिला अटक केली आहे.

भाषेचा हट्ट, मुलगा नसल्याची खंत

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ही महिला सायन्स ग्रॅज्युएट आहे. तिचं लग्न २०१७ मध्ये झालं होतं. पती आयटी इंजिनिअर आहे. लग्नानंतर दोन वर्षांनी मुलीचा जन्म झाला.

मात्र महिलेला मुलगा हवा होता, मुलगी नको होती, अशी मानसिकता तिच्या वागण्यात दिसून येत होती.

तसंच, मुलीला लहानपणापासून मराठी बोलण्यात अडचण होती. ती मराठीपेक्षा हिंदी जास्त बोलायची, यावरून आई सतत नाराज असायची.

ती पतीला वारंवार म्हणायची, “मला अशी मुलगी नको.”

पती तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण तिच्या मनातला द्वेष, असहिष्णुता आणि मानसिक अस्थैर्य वाढतच गेलं.

मानसिक आजार आणि उपचार

पोलिसांनी सांगितलं की, या महिलेवर मानसिक आजारासाठी उपचार सुरू होते. मात्र या सगळ्याचा फटका अखेर एका निष्पाप चिमुकलीला बसला.

https://amzn.to/4pfdQ03

आपलं सरकार

Click to listen highlighted text!