Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ : ठाकरे बंधूंची एकजूट, अजित पवारांची वेगळी वाट आणि भाजपाची ६६ उमेदवारांची पहिली यादी

Spread the love

मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सर्वच पक्षांनी कंबर कसली असून मुंबईची सत्ता कुणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

२० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र

या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाची आणि भावनिक घडामोड म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा एकत्र येऊन महानगरपालिका निवडणूक लढवत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीमुळे मुंबईच्या राजकारणात नवा वळणबिंदू निर्माण झाला आहे.

अजित पवारांची मुंबईत स्वतंत्र भूमिका

दुसरीकडे, राज्यातील सत्तासमीकरणांपासून वेगळी वाट धरत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांनी थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली आहे. त्यामुळे ‘मुंबई वेगळी, पुणे वेगळं’ असं चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणूक कधी?

गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली.

  • १५ जानेवारी २०२६ : मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान
  • १६ जानेवारी २०२६ : मतमोजणी व निकाल जाहीर

पहिल्या टप्प्यात झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपाप्रणीत महायुतीला चांगलं यश मिळालं होतं, त्यामुळे मुंबईतही भाजपाचा आत्मविश्वास वाढलेला दिसतो.

भाजपाची ६६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मुंबई महानगरपालिकेसाठी ६६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

या यादीत उत्तर मुंबईपासून दक्षिण मुंबईपर्यंत विविध समाजघटकांचे, अनुभवी तसेच नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. वरळी, गोरेगाव, अंधेरी, घाटकोपर, दहिसर, कांदिवली, मालाड, परळ अशा अनेक महत्त्वाच्या वॉर्डमध्ये भाजपाने आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत.

Buy Now – Decorative Wall Hanging For Door Entrance, Butterfly Evil Eye Wall Hanging For Protection And Elegance Home Decor.

मुंबईत भाजपाच्या उमेदवारांची यादी

वॉर्ड क्रमांक – २ – तेजस्वी घोसाळकर

वॉर्ड क्रमांक ७ – गणेश खणकर

वॉर्ड क्रमांक १० – जितेंद्र पटेल

वॉर्ड क्रमांक १३ – राणी त्रिवेदी

वॉर्ड क्रमांक १४ – सीमा शिंदे

वॉर्ड क्रमांक १५ – जिग्ना शाह

वॉर्ड क्रमांक १६ – श्वेता कोरगावकर

वॉर्ड क्रमांक १७ – शिल्पा सांगोरे

वॉर्ड क्रमांक १९ – दक्षता कवठणकर

वॉर्ड क्रमांक २० – बाळा तावडे

वॉर्ड क्रमांक २३ – शिवकुमार झा

वॉर्ड क्रमांक २४ – स्वाती जैस्वाल

वॉर्ड क्रमांक ३१ – मनिषा यादव

वॉर्ड क्रमांक ३६ – सिद्धार्थ शर्मा

वॉर्ड क्रमांक ३७ – प्रतिभा शिंदे

वॉर्ड क्रमांक ४३ – विनोद मिश्रा

वॉर्ड क्रमांक ४६ – योगिता कोळी

वॉर्ड क्रमांक ४७ – तेजिंदर सिंह तिवाना

वॉर्ड क्रमांक ५२ – प्रीती साटम

वॉर्ड क्रमांक ५७ – श्रीकला पिल्ले

वॉर्ड क्रमांक ५८ – संदीप पटेल

वॉर्ड क्रमांक ५९ – योगिता दाभाडकर

वॉर्ड क्रमांक ६० – सयाली कुलकर्णी

वॉर्ड क्रमांक ६३ – रुपेश सावरकर

वॉर्ड क्रमांक ६८ – रोहन राठोड

वॉर्ड क्रमांक ६९ – सुधा सिंह

वॉर्ड क्रमांक ७० – अनिश मकवानी

वॉर्ड क्रमांक ७२ – ममता यादव

वॉर्ड क्रमांक ७४ – उज्ज्वला मोडक

वॉर्ड क्रमांक ७६ – प्रकाश मुसळे

वॉर्ड क्रमांक ८४ – अंजली सामंत

वॉर्ड क्रमांक ८५ – मिलिंद शिंदे

वॉर्ड क्रमांक ८७ – महेश पारकर

वॉर्ड क्रमांक ९७ – हेतल गाला

वॉर्ड क्रमांक ९९ – जितेंद्र राऊत

वॉर्ड क्रमांक १०० – स्वप्ना म्हात्रे

वॉर्ड क्रमांक १०३ – हेतल गाला मार्वेकर

वॉर्ड क्रमांक १०४ – प्रकाश गंगाधरे

वॉर्ड क्रमांक १०५ – अनिता वैती

वॉर्ड क्रमांक १०६ – प्रभाकर शिंदे

वॉर्ड क्रमांक १०७ – नील सोमय्या

वॉर्ड क्रमांक १०८ – दिपिका घाग

वॉर्ड क्रमांक १११ – सारिका पवार

वॉर्ड क्रमांक ११६ – जागृती पाटील

वॉर्ड क्रमांक १२२ – चंदन शर्मा

वॉर्ड क्रमांक १२६ – अर्चना भालेराव

वॉर्ड क्रमांक १२७ – अलका भगत

वॉर्ड क्रमांक १२९ – अश्विनी मते

वॉर्ड क्रमांक १३५ – नवनाथ बन

वॉर्ड क्रमांक १४४ – बबलू पांचाळ

वॉर्ड क्रमांक १५२ – आशा मराठे

वॉर्ड क्रमांक १५४ – महादेव शिगवण

वॉर्ड क्रमांक – १७२ – राजश्री शिरोडकर

वॉर्ड क्रमांक – १७४ – साक्षी कनोजिया

वॉर्ड क्रमांक १८५ – रवी राजा

वॉर्ड क्रमांक १९० – शितल गंभीर देसाई

वॉर्ड क्रमांक १९५ – राजेश कांगणे (वरळी मतदारसंघ)

वॉर्ड क्रमांक १९६ – सोनाली सावंत

वॉर्ड क्रमांक २०७ – रोहिदास लोखंडे

वॉर्ड क्रमांक २१४ – अजय पाटील

वॉर्ड क्रमांक २१५ – संतोष ढोले

वॉर्ड क्रमांक २१८ – स्नेहल तेंडुलकर

वॉर्ड क्रमांक २१९ – सन्नी सानप

वॉर्ड क्रमांक २२१ – आकाश पुरोहित

वॉर्ड क्रमांक २२६ – मकरंद नार्वेकर

वॉर्ड क्रमांक २२७ – हर्षिता नार्वेकर

 

नवाब मलिकांचा मुद्दा पुन्हा चर्चेत

विशेष म्हणजे, नवाब मलिक यांच्या नेतृत्वाला विरोध करत भाजपाने मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती नाकारली होती.

मात्र, त्याच नवाब मलिकांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत उमेदवारी दिली आहे.

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालीच लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!