भारत जोडो यात्रा थांबवण्याचे आवाहन – आरोग्य मंत्री
कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. फक्त चीनच नव्हे तर जपान, दक्षिण कोरिया, ब्राझिल आणि अमेरिका या देशांमध्ये देखील कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे भारताने सावध होत उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी राहुल गांधींना पत्र लिहित भारत जोडो यात्रा थांबवण्याचे आवाहन केले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहित म्हटले की, कोरोना महामारी ही सार्वजनिक आपत्ती आहे. त्यामुळे देशहितासाठी भारत जोडो यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेता येईल. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेत कोरोनाच्या नियमांचे पालन करावे तसेच यात्रेदरम्यान सर्वांनी मास्क आणि सॅनिटायजरटचा वापर करावा. भारत जोडो यात्रेत फक्त कोरोना वॅक्सीन घेतलेल्या नागरिकांना सहभागी होण्याची परवानगी द्यावी. यात्रेदरम्यान नियमांचे पालन करता येत नसेल तर भारत जोडो यात्रा थांबवावी, असे देखील त्यांनी पत्रात म्हटले आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या पत्रानंतर कॉंग्रसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे. सचिन सावंत म्हणाले, आरोग्यमंत्र्याच्या पत्रावरून भारत जोडो यात्रेला भाजप किती घाबरली आहे हे दिसून येते. ट्रम्पजींना नमस्ते म्हणताना, मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडताना, बंगालमध्ये प्रचार करताना, तेव्हाच्या आरोग्य मंत्र्याने मोदीजींना हा सल्ला देण्याची हिंमत दाखवली असती तर देशात कोरोना वाढला नसता. यात्रा योग्य मार्गावर आहे हे स्पष्ट केले आहे.
Winter Session Live Updates: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…
News Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055