आग्रा महापालिकेने ‘ताजमहाल’ ला बजावली दोन कोटींची नोटीस
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याने ताजमहालसाठी सुमारे दोन कोटी रुपये पाणीपट्टी आणि सुमारे दीड लाख रुपयांचा मालमत्ता कर भरावा, अशी थकबाकीची नोटीस ३७० वर्षांच्या इतिहासात प्रथमच बजावण्यात आली आहे. तसेच आग्रा किल्ल्यासाठी पाच कोटी रुपये सेवा कर भरण्यास स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पुरातत्त्व खात्याला ही रक्कम भरण्याकरता १५ दिवसांची मुदतही देण्यात आली आहे.
ऐतिहासिक वास्तू, राष्ट्रीय स्मारकांना अशा प्रकारच्या करांतून सूट देण्यात येते, असे आग्रा येथील पुरातत्त्व खात्याच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. परंतु, ‘अनेक इमारतींना या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यातून दिलासा मिळण्याकरीता जे पात्र आहेत त्यांना तो दिला जाईल’, असे महापालिका आयुक्त निखिल तिकाराम फुंडे यांनी सांगितले आहे. तसेच आग्रा महापालिकेने या नोटीसमध्ये ताजमहालसाठी १.९४ कोटी रुपये पाणीपट्टी आणि १.४७ लाख रुपये मालमत्ता कर तसेच इत्माद-उद-दौला यांची कबर असलेल्या स्मारकासाठी १.४० लाख रुपये मालमत्ता कर भरण्यास सांगण्यात आले आहे. या नोटिसा २०२१-२२ आणि २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरता आहेत. पुरातत्त्व खात्याला ही रक्कम भरण्याकरता १५ दिवसांची मुदतही देण्यात आली आहे. दरम्यान, आग्रा कॅन्टोन्मेंट बोर्डाने पुरातत्त्व खात्याला आग्रा किल्ल्यासाठी पाच कोटी रुपयांचा सेवा कर वसूल करण्यासाठी नोटीस पाठवली आहे.
महापालिकेच्या या कृतीचा पुरातत्त्व खात्याच्या आग्रा सर्कलने निषेध केला आहे. ‘पुरातत्त्व खाते देशभरातील सुमारे चार हजार राष्ट्रीय स्मारकांची देखभाल करते. यापूर्वी अशा प्रकारच्या कोणत्याही करांचा भरणा खात्याने केलेला नाही. ताजमहाल आणि दौला यांची कबर ही राष्ट्रीय स्मारके असून त्यांना हे कर लागू होत नाहीत. आत्तापर्यंतच्या नोंदणी नुसार अशा प्रकारच्या नोटिस पहिल्यांदाच आल्या आहेत’, असे आग्रा सर्कलचे अधीक्षक पुरातत्त्व शास्त्रज्ञ राजकुमार पटेल यांनी सांगितले आहे.
धक्कादायक महिलेला ६ दिवस बांधून ठेवून सामुहिक बलात्कार
ताजमहाल ताजमहाल
News Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055