Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Winter Session Live Updates: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…

Spread the love

केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी. 

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055


22.12.22

  • जितेद्र आव्हाड यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप :

    बुधवारी रात्री भुखंडासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले. हे प्रतिज्ञापत्र बाहेर येऊ नये यासाठी आज दिवसभर गोंधळ घातला गेला, असा आरोप जितेद्र आव्हाड यांनी केला आहे. हे प्रतिज्ञापत्र जितेद्र आव्हाड यांनी वाचून दाखवले आहे.

 

  • जयंत पाटलांचे अधिवेशन काळापुरते निलंबन;

  • CBI म्हणतं दिशाची आत्महत्या, मग सभागृहात नौटंकी का करता?, विरोधी पक्षनेते अजित पवारांनी नितेश राणे-गोगावलेंना खडसावले

  • अध्यक्षांना अपशब्द वापरल्याचा आरोप, जयंत पाटील यांना १ वर्षासाठी निलंबित करा, भाजपच्या आमदारांची मागणी, विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक सुरु

Live | Maharashtra Vidhansabha Winter Session 2022

  • माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार बबनराव पाचपुते यांची प्रकृती खालावल्याने त्यांना विधान भवनातून रुग्णवाहिकेत टाकून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

  • दिशा सालियन प्रकरणावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे सभागृह तीनवेळा तहकूब करण्यात आले.

 

  • फोन टॅपिंग प्रकरणावरून विरोधी पक्षाकडून सभात्याग; अजित पवार विधानसभा अध्यक्षांवर संतापले

 

  • राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाओ, दिल्लीचे मिंधे एकनाथ शिंदे, ५० खोके भूखंड ओके, द्या खोके भूखंड ओके, राज्यपालांचे करायचे काय खाली डोके वर पाय, मुख्यमंत्री राजीनामा द्या अशा घोषणांनी विधान भवन परिसर आजही दणाणून सोडला.

 

  • फोन टॅपिंगचे आदेश का काढले? कुणी काढायला सांगितले? नाना पटोले-अजितदादांनी विधानसभा दणाणून सोडली

 

 

Live | Loksabha / Rajyasabha Winter Session 2022

https://www.facebook.com/dailymahanayak/videos/728833224956759

 

  • लोकसभेचे कामकाज दुपारी ४ वाजेपर्यंत तहकूब.

 

 

 

 

 

 


21.12.22

Live | Maharashtra Vidhansabha Winter Session 2022

 

  • पिंपरी-चिंचवड महापालिकेचा शासस्ती कर रद्द, अनधिकृत बांधकामे अधिकृत करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

 

  • विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, चीनमध्ये कोरोनाच्या उद्रेकाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत सरकारने याबाबत तातडीच्या उपाययोजना आखाव्यात अशी मागणी केली आहे

 

  • अस्थिव्यंग, गतिमंद , न्यूरोजीकल रुग्णांवरील उपचार सुविधा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट करण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करणार असल्याचे प्रतिपादन आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली.

 

  • नागपूर न्यास प्रकरणावरून विधानसभेत विरोधक आक्रमक, या विषयावर सरकाराला बोलायला परवानगी देण्यात आली त्या ठिकाणी गृहमंत्र्यांनी सरकारची बाजू मांडली आणि विधान सभेत मात्र, तुम्ही आम्हाला चर्चा करू देत नाही. तुम्ही म्हणता कोर्टात केस सुरू आहे. हे असे चालणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी म्हणाले. तसेच, कोर्टातील विषयवार मंत्र्यांना बोलू देता, आम्हाला बोलू दिले जात नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हणाले आहे.

  • नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून घोषणाबाजी करण्यात येत आहे.

  • टीसीएसच्या माध्यमातून लवकरच डॉक्टर, टेक्निशियनच्या साडे चार हजार जागांवर भरती; आरोग्य मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

 


Live | Loksabha / Rajyasabha Winter Session 2022

https://www.facebook.com/dailymahanayak/videos/859910815323439/

 

  • केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, २००५ मध्ये भाजप विरोधी पक्षात असताना त्यांनी सभेत चीनच्या सीमेचा मुद्दा उपस्थित केला होता, तेव्हा तत्कालीन सभागृह नेते प्रणव मुखर्जी आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यावर चर्चा करण्याऐवजी हा मुद्दा संवेदनशील असल्याने त्यावर अंतर्गत चर्चा व्हावी असे सांगितले होते.

 

  • लोकसभेत चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी केंद्रावर टीका केली आहे. “आज राहुल (गांधी) जी म्हणत आहेत की चीनवर ठोस कारवाई झाली पाहिजे. हा विषय सभागृहात मांडायला हवा केंद्र सरकार लष्कराच्या मागे लपत आहे. राष्ट्राशी संबंधित सर्व महत्त्वाच्या विषयांवर सभागृहात चर्चा व्हायला हवी.

 

  • चीनसोबतच्या सीमाप्रश्नावर चर्चेची मागणी करून देखील या विषयी चर्चा होत नसल्याने  विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केली आहे.

 

  • काँग्रेस खासदार अधीर रंजन यांनी लोकसभेत चीनच्या परिस्थितीवर चर्चेची मागणी केली

 

  • अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवरील संघर्षावर चर्चेची मागणी करत विरोधकांच्या निदर्शनेमुळे लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

  • सकाळी 11 ते दुपारी 12 सार्वजनिक महत्त्वाच्या बाबी उपस्थित केल्या जातील.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!