Boarder Dispute । महाराष्ट्राला इंचभरही जमीन न देण्याचा पुनरूच्चार ; विरोधकांची सहमती
महाराष्ट्र-कर्नाटक (Maharashtra Karnataka Boarder Dispute) सीमाप्रश्नावरून पुन्हा वाद पेटला असताना कर्नाटक विधिमंडळात मुख्यमंत्री बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी महाराष्ट्राला इंचभरही जमीन न देण्याचा पुनरूच्चार केला आहे. याबाबत विधिमंडळात ठराव मांडण्यात येणार असल्याची माहिती कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली आहे.
कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी विधानसभेत सीमावादावर झालेल्या चर्चेदरम्यान स्वत: राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने ठराव पास करण्याची सूचना केली. तसेच, सीमावादावरील आपल्या भूमिकेचा यावेळी त्यांनी पुनरुच्चार केला. कर्नाटक विधानसभेची दोन्ही सभागृहं महाराष्ट्रासोबतच्या सीमावादावर ठराव संमत करणार आहेत. यासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांनी म्हणाले की, सीमावादाच्या मुद्द्यावर विधिमंडळाची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. आहे. महाराष्ट्राला राज्याची एक इंचही जमीन देणार नाही. जर सर्वांनी सहमती दर्शविली तर आम्ही सीमाप्रश्नावरील चर्चेवर सरकारला उत्तर देताना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात राज्याच्या भूमिका स्पष्ट करणारा ठराव मंजूर करू.
www.facebook.com/dailymahanayak/videos/859910815323439/
कर्नाटक विधिमंडळात हा प्रस्ताव मांडल्या नंतर सभागृहातील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यासह सर्व राजकीय पक्षांच्या सदस्यांनी बोम्मई यांच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली. चर्चेला सुरुवात करताना सिद्धरामय्या म्हणाले की, या प्रकरणात कोणत्याही वादाचा प्रश्नच उद्भवत नाही आणि महाजन आयोगाच्या अहवालासोबतच सीमाप्रश्नावर तोडगा निघाला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन कोणीही सीमाभागांवर दावा करू नये, असा सल्ला दिला होता. मात्र तरीही कर्नाटकचे मुख्यंत्री बसवराज बोम्मई आडमुठेपणाची भूमिका घेताना दिसत आहेत.
मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानावरून अधिवेशनात गदारोळ
News Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055