मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानावरून अधिवेशनात गदारोळ
संसदेच्या अधिवेशनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानावरून चांगलाच गदारोळ झाला. त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेस अध्यक्षांनी माफी मागावी अशी मागणी भाजप करत आहे. मात्र, मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागण्यास स्पष्ट नकार देत मी अजूनही माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले सांगितले आहे. खरगे म्हणाले की,मी ते सभागृहाबाहेर बोलले आहे. सत्ताधारी पक्षाच्या खासदरांनी त्यांनी संसदेत माफी मागावी अशी मागणी केली होती त्यामुळे संसदेत सतत गोंधळ सुरु होता. या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज ११.३० पर्यंत तहकूब करण्यात आले होते.
अल्वरमधील मालाखेडा येथे सोमवारी झालेल्या जाहीर सभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खर्गे यांनी भाजपच्या अपक्षांच्या भूमिकेवर वक्तव्य केले होते. त्यामुळे सध्या वाद सुरु आहे. ते म्हणाले की, ‘आम्ही (काँग्रेस पक्ष) देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिले आहे. भाजपला सवाल करत ते म्हणाले की, आमच्या पक्षाच्या नेत्यांनी जीव दिला, तुम्ही काय केले? तुमच्या घरातील कोणी देशासाठी कुत्रा तरी मेला आहे का? (कोणी) काही त्याग केला आहे का?’. (हमारे पार्टी के नेताओं ने अपनी जान दी, आपने क्या किया? आपके घर में कोई देश के लिए कुत्ता तक मरा है? क्या(किसी ने) कोई कुर्बानी दी है?’.) दरम्यान ते म्हणाले की, भाजप स्वतःला देशभक्त म्हणतात आणि जेव्हा आम्ही काही बोलतो तेव्हा आम्हाला देशद्रोही घोषित केले जाते. सध्या अशीच परिस्थिती आहे, देशात हेच घडत आहे. त्यांच्या या विधानावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात चांगलाच गदारोळ पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून, भाजप एकीकडे खरगेंच्या मुद्द्यावरून विरोधकांवर हल्लाबोल करत आहे. तर दुसरीकडे, संसदेच्या आतापर्यंतच्या कामकाजात चीनच्या मुद्द्यावरून झालेल्या चर्चेबाबत विरोधक सरकारला घेरण्यात गुंतले आहेत. त्यामुळे सध्या सरकार बाकी मुद्यांपासून बचावले जात आहे हे खरं.
#LiveUpdates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी