धक्कादायक पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार
पालघर जिल्ह्यातील माहीम येथील एका १५ वर्षीय मुलीवर आठ नराधामांनी सामुहिक बलात्कार केला आहे. या घटनेनंतर सातपाटी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून, पीडित अल्पवयीन मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पालघर जिल्ह्यात माहीम येथे वास्तव्य करणारी एक १५ वर्षीय तरुणी आपल्या मित्रासह किनाऱ्या लगतच्या टेंभी परिसरात गेली असता निर्जन ठिकाणी असणाऱ्या बंगल्यांमध्ये आठ तरुणांनी आलटून पालटून रात्रभर तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर शनिवारी सकाळी या मुलीला भीती दाखवून पालघर जवळील माहीम हरणवाडी परिसरात सोडून फरार झाले. परंतु आपली मुलगी रात्रभर घरी न आल्याने तसेच मोबाईलवर संपर्क होत नसल्याने तिच्या पालकांनी सातपाटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मुलीचे वय व प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन मुलीचे मोबाईल लोकेशन द्वारे सातपाटी पोलीस त्या ठिकाणापर्यंत पोहोचले व मुलीला ताब्यात घेतले.
या मुलीवर प्राथमिक वैद्यकीय उपचार केल्यानंतर पोलिसांनी पीडित तरुणीला पालकांसोबत घेऊन दोषी तरुणांची माहिती मिळवली. त्यानंतर पोलिसांनी जिल्ह्यातील माहीम, हनुमान पाडा, टेम्भी, सफाळे आणि वडराई या ठिकाणी छापेमारी करत आरोपींना अटक केली. त्यानंतर सर्व आठही आरोपींवर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या काही आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे. याप्रकरणी संबंधितां – विरुद्ध पॉस्कॉ व अपहरण केल्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पालघरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी नीता पाडवी या प्रकरणी तपास करीत आहेत.
बेपत्ता महिलेचा मृतदेह शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला
News Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055