Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दुसऱ्या कसोटी सामन्यातून आणखी एक खेळाडू बाहेर – बीसीसीआय

Spread the love

भारतीय संघाला दुसरा मोठा धक्का. दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मानंतर आता भारतीय संघातील वेगवान गोलंदाज नवजीप सैनी संघाबाहेर गेला आहे.

२२ डिसेंबरपासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. पण या सामन्यात भारतीय संघातील वेगवान गोलंदाज नवजीप सैनी आता दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नवदीप सैनीच्या पोटातील स्नायू दुखावले गेले आहेत. त्यामुळे तो दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. बीसीसीआयने एक ट्विट केले आहे. यामध्ये बीसीसीआयने रोहित शर्मा आणि नवदीन सैनी हे दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे आता भारतीय संघ नवदीप सैनीच्या जागी कोणत्या खेळाडूला संघात स्थान देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

या सामन्यात जर भारताने विजय मिळवला तर त्यांना विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचता येऊ शकते. त्यामुळे भारतासाठी हा सामना महत्वाचा आहे. या सामन्यात रोहित शर्माला जी वनडे मालिकेत दुखापत झाली होती, ती अजून बरी झालेली नाही. त्यामुळे तो या दुसऱ्या सामन्यातही खेळणार नसल्याते बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. तसे, भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात दमदार विजय मिळवला होता. त्यामुळे आता भारतीय संघाला ही मालिका गमावण्याची चिंता नसेल. कारण भारताने दुसरा सामना जरी गमावला तरी ही मालिका १-१ अशी बरोबरीत राहील, पण भारताने हा सामना जिंकला तर त्यांना २-० असा विजय मिळवता येऊ शकतो. हा विजय भारताच्या भविष्यातील स्पर्धांसाठी महत्वाचा ठरणारा आहे. त्यामुळे आता दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

#LiveUpdates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

 

News Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!