भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने जाहीर केली निवृत्ती
टेनिसपटू सानिया मिर्झाने सोशल मीडियावर पोस्ट करत प्रोफेशनल टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये तिने ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेनंतर आपल्या मुलासोबत अधिक वेळ घालवणार असून यासाठी टेनिसमधून निवृत्ती घेणार असल्याचे भावनिक पोस्ट शेअर केले आहे.
https://www.instagram.com/p/CnWpBCUITkX/
सानिया मिर्झाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले आहे कि, ३० वर्षांपूर्वी हैदराबादमधील एक सहा वर्षांची मुलगी पहिल्यांदा टेनिस कोर्टवर गेली, तिच्या आईसोबत गेली आणि प्रशिक्षकाने टेनिस कसे खेळायचे हे समजावून सांगितले. मला वाटत होते की मी टेनिस शिकण्यासाठी खूप लहान आहे. माझ्या स्वप्नांचा लढा वयाच्या सहाव्या वर्षीच सुरू झाला. अशी भावनिक पोस्ट करून तिने तिचे फोटो देखील पोस्ट केले आहेत. तसेच ती ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेनंतर तिच्या मुलासोबत अधिक वेळ घालवण्यासाठी आणि त्याला आता माझी अधिक गरज असल्याने निवृत्ती घेत असल्याचेहि या पोस्टमध्ये सांगितले आहे.
भारतात तालिबानसारखी परिस्थिती निर्माण होईल… केसीआर चा भाजपावर हल्लाबोल
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055