भारत जोडो यात्रेत काँग्रेस खासदार संतोख सिंग चौधरी यांचे निधन

राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमध्ये आहे. यात्रेदरम्यान काँग्रेसचे खासदार संतोख सिंग चौधरी यांचे निधन झाले आहे. आज सकाळी फिलूर येथे पदयात्रेला प्रारंभ झाला तेव्हा संतोख सिंग चौधरी यांना हृदयविकाराचा झटका आला. संतोख सिंग हे जागीच कोसळले. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, डॉक्टरांनी संतोख सिंग यांना मृत घोषित केले. राहुल गांधी यांनीही रुग्णालयात धाव घेतली त्यामुळे भारत जोडो यात्रा स्थगित करण्यात आली आहे.
Congress national president Mallikarjun Kharge condoles the demises of party MP Santokh Singh Chaudhary.
"Deeply shocked and saddened to learn about the untimely passing away of our MP, Santokh Singh Chaudhary..," he tweets. pic.twitter.com/jZQulVQ12a
— ANI (@ANI) January 14, 2023
राहुल गांधी यांच्या पदयात्रेला सकाळी सात वाजता प्रारंभ झाला. सकाळी दहा वाजेपर्यंत यात्रा गोराया येथे पोहोचणार होती. दुपारी जेवणासाठी पदयात्रा थांबणार होती. त्यानंतर तीन वाजल्यापासून पुन्हा प्रारंभ होणार होता. त्यानंतर कपूरथळा येथे यात्रा समाप्त होणार होती. मात्र, आता संतोख सिंग यांच्या निधनामुळे आजची भारत जोडो यात्रा स्थगित करण्यात आली आहे.
संतोख सिंग चौधरी ७६ वर्षांचे होते. आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास ते यात्रेत राहुल गांधींसोबतच होते, त्यानंतर अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना घाम येऊ लागला व ते खाली पडले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विट करून संतोख सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
भारतात तालिबानसारखी परिस्थिती निर्माण होईल… केसीआर चा भाजपावर हल्लाबोल
#MahanayakNews #BharatJodoYatra #RahulGandhi #CongreesMP #SantokhSingh #Currentnews #PoliticalUpdate
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055