Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारतात तालिबानसारखी परिस्थिती निर्माण होईल… केसीआर चा भाजपावर हल्लाबोल

Spread the love

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महबूबाबाद आणि कोठागुडेम येथील जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यानंतर संबोधित करताना केसीआर यांनी भाजपावर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला आहे. धार्मिक आणि जातीय कट्टरतेला प्रोत्साहन दिल्यास समाजात उभी फूट पडून नरक बनेल. तसेच, भारतात अफगाणिस्तानप्रमाणे तालिबानसारखी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे तरुणांनी सतर्क राहण्याचा सल्ला केसीआर यांनी दिला आहे.

महबूबाबाद आणि कोठागुडेम येथील जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी उद्घाटन केले. त्यानंतर केसीआर म्हणाले कि, केंद्रात पुरोगामी विचारांचे आणि निप:क्षपाती सरकार असेल तर देश, राज्य प्रगती करू शकेल. केंद्राने राज्य सरकारला मदत न केल्याने तेलंगणाचे जीडीपी वाढले नाही,” असा आरोप केसीआर यांनी केला. तेलंगणाची निर्मिती २०१४ साली झाली, तेव्हा राज्याचा जीएसडीपी ५ लाख कोटी रुपये होता. तो सध्या १४.५० लाख कोटी असायला हवा होता. पण, आता ११.५ लाख कोटी राज्याचा जीएसडीपी आहे. केंद्राच्या अकार्यक्षम धोरणांमुळे तेलंगणाला ३ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आकडेवारी अर्थतज्ज्ञ, आरबीआय आणि कॅगने दिली आहे. असा दावा केसीआर यांनी केला.

तसेच, देशाची अवस्था तालिबानसारखी झाली, तर गुंतवणूक येईल का? नोकऱ्या मिळतील का? सध्याचे उद्योगधंदे राहतील का? देशात अशांतता निर्माण होत, लाठीचार्ज आणि गोळीबारसारखे वातावरण निर्माण झाले, तर समाज कसा राहणार? देशाला चुकीच्या मार्गावर नेण्याचे प्रयत्न होत आहेत,असेही केसीआर म्हणाले. दरम्यान, अप्रत्यक्षपणे केसीआर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला, देशात पाणी आणि विजेची संसाधने उपलब्ध आहेत. तरी, केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्या-राज्यात पाण्यावरून वाद सुरु आहे. दिल्लीतही पिण्याचे पाणी आणि विजेचा पुरवठा सुरळीत होत नाही, हे लज्जास्पद आहे. असे असतानाही मोठी-मोठी भाषणे केली जातात.

 

एसटी कर्मचाऱ्यांचे आजच होणार पगार… राज्य सरकारकडून ३०० कोटींचा निधी वितरीत

#KCR #BJP #GalliteDilli #Newsupdate #Currentupdate #PoliticalNewsUpdate #MahanayakOnline #Headlines #Topnews #MahanayakNews


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!