Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : ‘हर हर महादेव’ वरून झी टीव्हीला संभाजी राजे यांचा इशारा …

Spread the love

कोल्हापूर : युवराज छत्रपती संभाजी राजे ‘हर हर महादेव ‘ वरून आक्रमक झाले आहेत.  सिनेमागृहात  ‘हर हर महादेव’ हा चित्रपट बंद पाडल्यानंतर आता १८ डिसेंबर रोजी ‘झी मराठी’ या वाहिनीवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  या चित्रपटाचे प्रदर्शित करू नये अन्यथा गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.


गेल्या काही दिवसांपासून ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून चांगलाच वाद सुरू आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या चित्रपटाला विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील आक्रमक भूमिका घेत ठाण्यात या चित्रपटाचे काही शो बंद पाडले होते. तर मनसेने या चित्रपटाचे समर्थन केले होते. दरम्यान, हा चित्रपट आता टीव्हीवर प्रदर्शित होत असल्याने छत्रपती संभाजीराजे यांनी आक्षेप घेतला आहे. जर हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित झाला, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी ‘झी स्टुडिओ’ला दिला आहे. तसेच त्यांनी ‘झी स्टुडिओ’च्या प्रमुखांना पत्रदेखील लिहिले आहे. ट्वीट करत त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

‘हर हर महादेव’ हा चित्रपट सिनेमागृहात बंद पाडल्यानंतर आता १८ डिसेंबर रोजी ‘झी मराठी’ या वाहिनीवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आलेला व तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणारा हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित करू नये, याबाबत स्वराज्य संघटनेने ‘झी स्टुडिओ’ला पत्र लिहून सूचित केले आहे. जर या सूचनेकडे कानाडोळा करून हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना ‘झी स्टुडिओ’ जबाबदार असेल, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!