Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MharashtraPoliticalUpdate : पिआरपीचे नेते जोगेंद्र कवाडे यांचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षासोबत जाण्याचे संकेत …

Spread the love

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीचे संकेत मिळताच  पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते माजी खासदार जोगेंद्र कवाडे आणि त्यांचे पूत्र  जयदीप कवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली असल्याचे वृत्त आहे. या चर्चेनंतर लवकरच कवाडे हे शिंदे गटात सामील होतील असे सांगितले जात आहे.


दरम्यान एका बाजूला उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर हे एकत्र येत असल्याच्या चर्चा सुरू असतानाच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे कार्याध्यक्ष आणि जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र जयदीप कवाडे यांनी युतीचे संकेत दिले असून लवकरच महाराष्ट्रामध्ये चांगलं चित्र पाहायला मिळेल असं सूचक वक्तव्य केले आहे. लवकरच माजी खासदार जोगेंद्र कवाडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकत्र दिसतील असे चित्र संपूर्ण महाराष्ट्र बघायला मिळणार आहे.

वास्तविक पाहता  पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते जोगेंद्र कवाडे महाविकास आघाडीबरोबर होते. परंतु दरम्यानच्या काळात महाविकास आघाडीचे नेते आणि त्यांच्यात कुठलाही संवाद नव्हता त्यामुळे ते नाराज होते. अखेर त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.जोगेंद्र कवडे यांचे पूत्र  जयदीप कवाडे यांनी स्वतः ही माहिती दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!