अखेर प्रसाद लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली

गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे वाद सरू असतानाच भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आगीत तेल ओतले आहे. शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असल्याचे म्हणाले त्यांच्या या वक्तव्यावरुन प्रचंड रोष पाहायला मिळाला. या सगळ्यानंतर प्रसाद लाड यांनी अखेर या सगळ्याविषयी दिलगिरी व्यक्त केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस राजकारण करण्याचा प्रयत्न करते, त्याचा मी निषेध करतो. स्वराज्य कोकण भूमी या कार्यक्रमात बोलताना स्पष्ट म्हटले होते, छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी आणि स्वराज्याची स्थापना कोकणातून झाली. तर, शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असे अनावधाने माझ्याकडून बोलले गेले. मात्र, माझ्याबाजूला बसलेल्या संजय यादव यांनी ती चूक सुधारत शिवनेरीवर जन्म झाला सांगितले. माझ्या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असा खुलासा प्रसाद लाड यांच्याकडून देण्यात आला.
काय ते अगाध ज्ञान! इतिहासाला कोड्यात टाकणारा हा इतिहास! वा गुरूजी, जन्म कोकणातील, स्वराज्याची शपथ रायगडावर, बालपण रायगडावर! अध्यक्ष महोदय,माझी विनंती आहे की अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे इतिहासाचे दाखले देण्यास एकतर मनाई करावी किंवा अशा व्यक्तींना इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून किंवा कोणत्याही शिवभक्ताकडून विशेष प्रशिक्षण देण्यात यावे. अमोल कोल्हे यांनी प्रसाद लाड यांच्यावर ट्विट करून टीका केली.
निषेध किंवा धिक्कार करणे पालथ्या घड्यावर पाणी आहे.. पुन्हा इतिहास रूजवावा लागणार, जागवावा लागणार!#ChhatrapatiShivajiMaharaj
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 4, 2022
News Update on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055