Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SocialMediaUpdate : व्हॉट्सअॅपची सेवा ठप्प , सर्व्हरमध्ये बिघाड…ये क्या हुवा ? मिम्सचा पाऊस …

BERLIN, GERMANY - FEBRUARY 25: The Logo of instant messaging service WhatsApp is displayed on a smartphone on February 25, 2018 in Berlin, Germany. (Photo by Thomas Trutschel/Photothek via Getty Images)

Spread the love

नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपची सेवा दुपारी एक वाजता अचानक खंडित झाली. तेव्हापासून ग्राहकांचे प्रचंड हाल होत आहेत. अचानक सर्व्हर डाउन झाल्यामुळे, वापरकर्ते संदेश पाठवू किंवा प्राप्त करण्यास सक्षम नाहीत, यामुळे लोक नाराज आहेत. व्हॉट्सअॅपच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने ही समस्या आली आहे.

ट्विटरवर #whatsappdown असा ट्रेंड चालू असून यूजर्सनी धमाल मिम्स टाकले आहेत. कंपनीच्या ट्विटर हँडलवर मात्र अद्याप कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही. दरम्यान दीड तासानंतर कंपनीने आपले स्पष्टीकरण देताना आश्वस्त केले आहे कि , लवकरच सेवा पुरवत करीत आहोत. आधी लोकांना आपल्या फोनचा , नेटचा प्रॉब्लेम असेल असे वाटल्याने यूजर्सनी या दोन्हीही गोष्टी तपासून पहिल्या. फोन रिस्टार्ट केले पण नंतर बातम्या सुरु झाल्या कि , हा प्रॉब्लेम कंपनीचा आहे.

दरम्यान व्हॉट्सअॅप व्यतिरिक्त, फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या मालकीची कंपनी मेटा यांच्या प्रवक्त्याने न्यूज एजन्सी रॉयटर्सशी बोलताना सांगितले की, त्यांची टीम लवकरात लवकर सेवा रिस्टोर करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मेटाच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्हाला माहिती आहे की, काही यूजर्संना मेसेज पाठवणे आणि मिळण्यास अडचण येत आहे. आम्ही लवकरच ही सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, असे प्रवक्याने सांगितले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!