Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PMModiNewsUpdate : ऋषी सुनक यांच्या निवडीचे अभिनंदन करून पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली हि इच्छा …

Spread the love

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल भारतीय वंशाचे ऋषी सुनकट्विटरवरून अभिनंदन केले आहे. तसेच जागतिक समस्यांवर एकत्र काम करण्यास आणि रोडमॅप २०३० ची अंमलबजावणी करण्यास ते उत्सुक असल्याचे सांगितले आहे. पंतप्रधान मोदी ट्वीट करून असे म्हटले आहे.


पंतप्रधान मोदी ट्वीट करून म्हणाले की, “ऋषी सुनक यांचे मनःपूर्वक अभिनंदन! तुम्ही ब्रिटनचे पंतप्रधान बनणार आहात, मी जागतिक समस्यांवर एकत्र काम करण्यास आणि रोडमॅप 2030 ची अंमलबजावणी करण्यास उत्सुक आहे. ब्रिटिश भारतीयांना दिवाळीच्या विशेष शुभेच्छा. आपण ऐतिहासिक संबंधांचे आधुनिक भागीदारीत रूपांतर केले आहे.

दरम्यान ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल ऋषी सुनक यांनी म्हटले आहे की, सहकारी खासदारांचा पाठिंबा मिळाल्याने आणि नेतेपदी निवड झाल्याने आपण  कृतज्ञ असून . ही जबाबदारी आपण नम्रतेने स्वीकारत आहोत.  या निवडणुकीत ब्रिटनच्या माजी गृहमंत्री प्रिती पटेल, कॅबिनेट मंत्री जेम्स क्लेव्हर्ली आणि नदीम जाहवी यांच्यासह अनेक प्रमुख कंझर्वेटिव्ह खासदारांनी माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा गट सोडत सुनक यांना पाठिंबा दिला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!