Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mumbai News update : डॉ. यशवंत चावरे लिखित “महाडचा मुक्तीसंग्राम” ग्रंथाचे प्रकाशन

Spread the love

मुंबई : डाॅ यशवंत चावरे लिखित महाडचा मुक्तीसंग्राम ऐतिहासिक चवदार तळे दिवाणी प्रकरण न्यायालयीन अभिलेख व कामकाज या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा डाॅ बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रकाशन संस्था आणि सत्याग्रह महाविदयालय नवी मुबईच्या वतीने, राजर्षी शाहू सभागृह, शिवाजी नाटय मंदीर दादर (पश्चिम) मुंबई येथे न्यायमुर्ती हेमंत गोखले, सर्वोच्च न्यायालय यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

या कार्यक्रमाला अॅड. बाळासाहेब आंबेडकर, कुमार केतकर, भिमराव आंबेडकरांचे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. अॅड बाळासाहेब आंबेडकरांनी ग्रंथाचे प्रकाशन केले. कार्यक्रमाचे प्रस्तावित जेष्ठ विचारवंत डाॅ जी के डोंगरगावकर यांनी केले. सुत्रसंचालन गुलाबराव अवसरमल यंानी केले.

कुमार केतकर

महाडचा मुक्ती संग्राम या ग्रंथावर पत्रकार कुमार केतकर यांनी सविस्तर मांडणी केली. एस के बोले यांनी 1923 मध्ये तत्कालीन अस्पृशांना सार्वजनिक तळे, शाळा, दवाखाने खूले असावेत असा ठराव मुंबई विधी मंडळात पारित करण्याचा प्रस्ताव दिला त्याला विधी मंडळाने मान्यता दिली. या ठरावाची अमलबजावणी सार्वजनिक रित्या 1923 ते 1927 पर्यंत झाली नव्हती म्हणून अस्पृष्यांना कायदयाने मान्य केलेला सार्वजनिक तळयाचे पाणी प्राशण करण्याचा निर्णय बहिष्कृत हितकारणी संभेने डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली 20 मार्च 1927 ला घेतला. त्यासाठी डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्वतः महाड येथिल चवदार तळयाचा मुक्तीसंग्राम आपल्या कार्यकत्यासह मोठया निश्चयांने लढवला.

मानवी हक्कासाठी भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच हा लढा पाण्यासाठी नव्हे तर सार्वजनिक तळयाचे पाणी पिण्याचा मूलभूत हक्क कायदयाने मान्य करून ते बजावण्यासाठीचा हा सत्याग्रह होता.  महाडचा हा  मुक्तीसंग्राम 20 मार्च 1927 ला लढला. या विरोधात सनातनी हिंदूनी कोर्टाबाहेर प्रतिकार केलाच. पण त्याच बरोबर 1927 ते 19़37 असा प्रदिर्घ लढा दिला. तो लढा आजही पुन्हा एकदा करण्याची आवश्यकता कुमार केतकरांनी मांडली.

कुमार केतकरांनी महाडचा मुक्तीसंग्राम हा ख-या अर्थाने मानवी हक्कासाठीचा हा लढा असून हा लढा कोर्टामध्ये सुध्दा टिकला. कार्टाने अस्पृष्यांचे मानवी हक्क मान्य केले. या बाबातचा परिश्रमपुर्वक ग्रंथ डाॅ यशवंत चावरे यांनी शब्द बध्द केला असल्याचे कूुमार केतकर म्हणाले. गेल्या 99 वर्षा पुर्वीचे अस्पृष्यांचे प्रश्न आणि विदयामान भारतातील सामाजिक स्थिती यामध्ये बरच साम्य असल्याच कुमार केतकर म्हणाले.

भारताच्या अनेक राज्यात अनुसुचित जाती जन जातीवर होत असलेले आणि झालेल्या जातीय अन्याय अत्याचाराच्या अनेक प्रकरणाची सभाग्रहाला माहिती देत ते म्हणाले जातीय अन्याय अत्याचाराचा गंभीर प्रकार कायदेशीर कार्यवाहीत असलेली उदासिनता आणि हिंदू पुढा-यांच्या नाकार्ते पणामुळे अन्याय अत्याचार घडत आहेत. त्यामूळेच गुन्हेगार निर्दोष सुटण्याचे प्रमाण दिवसागणित वाढत आहे. अस्पृष्यता निवारण्याची चळवळ खंडीतच झाली आहे. एक गाव एक पानवटा ही अर्धवट राहिलेली चळवळ असून हिंदूत्ववादी याकडे दूर्लक्ष करतात असे ते म्हणाले.

बाळासाहेब आंबेडकर

अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी डाॅ चावरे लिखित महाडचा मुक्ती संग्राम हा ग्रंथ सर्वांनी वाचने आवश्यक आहे. या ग्रंथात डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेली वकील क्रतृत्वाची कार्यकौश्यल्या आणि डावपेच हे आजच्या वकीलाला प्रेरणादायी आहेत.

ग्रंथाचे लेखक डाॅ यशवंत चावरे यांनी ग्रंथ निर्मिती मागची भूमिका मांडली.

हेमंत गोखले

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय  हेमंत गोखले यांनी या ग्रंथाविषयी भरभरून कौतूक केले. ते म्हणाले डाॅ यशवंत चावरे यांनी या ग्रंथ निर्मितीसाठी फारच परिश्रम घेतले आहे. हा ग्रंथ परिपूर्ण आहे.

या ग्रंथात महाडच्या मुक्तीसंग्रामात महाड ते मुंबई उच्च न्यायालयात हे तळे खाजगी नसून सार्वजनिक आहे व अस्पृश्यांना पाणी प्राशन करण्याचा अधिकार आहे का याबाबत सनातनी हिंदूच्या वतीने लढणारे वादी आणि प्रतिवादी म्हणून डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी न्यायालयात घेतलेल्या भूमिका याचं संकलन व त्यावरच लेखन अत्यंत निपक्षपातीपणे केले आहे. या ग्रंथात न्यायालयात घडलेेल्या लढयाबाबतच विस्तृत्व वर्णन आहे. न्यायालयिन लढयातील वादी, प्रतिवादी, सरकार, न्यायालयाची भुमिका, साक्षीदार, या बाबतच जैसे थे संकलन आणि त्याची वस्तुनिष्ठ माडणी तटस्त पणे डाॅ यशवत चावरे यांनी या ग्रंथात मांडले आहे.

महाडचा मुक्तीसंग्राम याबाबत फार कमी साहित्य उपलब्ध आहे यात यशवंत चावरे यांनी भर टाकली आहे. हे या ग्रंथाचंे एक वेगळे पण आहे. सनातन हिंदू एकाबाजूने अस्पृष्यांचे तळयाचंे पाणी पिण्याचे आधिकार नाकारत असताना पालये शास्त्री, डाॅ कुर्तकोटी शंकराचार्य करवीर पीठ, बी जी खेर, नारायण दामोदर सावरकर व सुरेंद्रनाथ टिपणीस, त्र्यंबक सिताराम या ब्राम्हण आणि कायस्त प्रभू जमातीतील साक्षीदारांनी अस्पृश्यता हिंदू धर्म शास्त्राला अमान्य असल्याची साक्ष दिली. त्यामूळे साहजिकच मुंबई उच्च न्यायालयाने महाडचे चवदार तळे खाजगी नसून सरकारी आहे. आणि अस्पृष्यता हिंदू धर्म शास्त्राला अमान्य असल्यामुळे अस्पृश्याना महाडचे तळे खुले असल्याचा न्याय निवाडा दिला. तो उभयंतानी मान्य केला. हे पहिल्यांदाच ग्रंथ रूपाने व कोर्टातील साक्षीदाराच्या मुळ कागदपत्राच्या संकलनासह डाॅ यशवंत चावरे यांनी प्रकाशात आणले त्यामुळे हिंदू आणि अस्पृष्य यातील दुफळी संपुष्ठात येण्यास हा ग्रंथ कामी येणार आहे एवढेच नव्हे महाड चवदार तळयाचा मुक्तीसंग्राम हे 21 व्या शतकातील तरूणांना नव्या आव्हाणास सामोर जाण्यासाठी तथा नवे सत्याग्रही निर्माण होण्यासाठी हा ग्रंथ प्रेरणादायी आहे.

पुढे गोखले म्हणाले की, भारतीय संविधानाने अस्पृश्यता कोणत्याही स्वरूपात पाळणे कायदयाने गुन्हा आहे. यासाठी स्वतंत्र कायदा करण्यास फार विलंब झाला. 1989 मध्ये अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती अत्याच्यार प्रतिबंध कायदा पारित झाला. त्याला देखील अनेक फाटे पाडून या कायदयाची परिणामकारकता कोर्टातून सुध्दा शिथिल होत आहे याबद्दल त्यंानी दुःख व्यक्त केले. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी आपल्या अधिकारा विषयी जागृत राहिले पाहिजे .

या कार्यक्रमात या ग्रंथाचे प्रकाशक व वितरक अॅड आसित चावरे आणि राजरत्न डोगरगावकर यांचा सन्मान बौध्द महासभेचे कार्यध्यक्ष  भिमराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाला पुणे, नांदेड, अलिबाग, नवी मुंबई आणि मुंबईतील अनेक मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. विशेषतः ज. वी. पवार, सुधाकर सुराडकर, डाॅ निलकंठ शेरे, डाॅ डी. के. सोनावणे, समाजकल्याण सहसचिव दिनेश डिंगळे, आणि. सत्याग्रह महाविदयालयातील विदयार्थी, शिक्षक आणि कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!