Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NCPNewsUpdate : मोठी बातमी : अजित दादा पुन्हा रुसले , राष्ट्रवादीच्या दिल्ली येथील अधिवेशनाच्या बैठकीतून उठून गेले आणि पुढे काय झाले …!!

Spread the love

नवी दिल्ली: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी रविवारी पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची बैठक अर्धवट सोडली. शरद पवार मंचावर उपस्थित असताना पक्षातील प्रमुख नेत्यांपैकी एक अजित पवार यांनी हे पाऊल उचलले. असे केल्याने राष्ट्रीय अधिवेशनाला संबोधित करण्याची संधीही त्यांनी गमावली.


वास्तविक पाहता राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाचे संस्थापक शरद पवार यांची पुन्हा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानंतर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना शरद पवार यांच्या निवडीचे स्वागत करून “शरद पवार ” यांच्यामुळेच पक्षाला ओळख असल्याचे सांगत पवार यांच्या निवडीचे समर्थन केले. मात्र पक्षीय लोकशाहीनुसार अध्यक्षपदासाठी अर्ज मागविण्यात आले होते परंतु शरद पवार यांचे नेतृत्व सर्व मान्य असल्यामुळे या पदासाठी कुणाचाही अर्ज आला नसल्याचे त्यांनी सांगितले होते.

या  परिषदेत पक्षनेते जयंत पाटील यांना त्यांच्यासमोर बोलण्याची संधी मिळताच अजित पवार काही क्षणातच मंचावरून उठून निघून गेले. त्यांच्या या खेळीमुळे पक्षात फूट पडल्याच्या अफवा आणि चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान याचवेळी राष्ट्रवादीचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी व्यासपीठावर घोषणा केली की, शरद पवारांच्या समारोपीय भाषणापूर्वी अजित पवार आपले भाषण करतील, पण माजी उपमुख्यमंत्री आपल्या जागेवरून गायब असल्याचे दिसून आले.

यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार वॉशरुममधून परतल्यावर भाषण करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या माजी उपमुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या अजित पवार यांना मंचावर आणण्यासाठी समजावताना दिसल्या. त्यानंतर काही वेळातच अजित पवार कार्यक्रमस्थळी दाखल झाले तेव्हा पक्षाचे सुप्रिमो शरद पवार यांनी समारोपाचे भाषण सुरू केले. त्यामुळे अजित पवारांना बोलण्याची संधी मिळू शकली नाही.

२०१९ मध्ये, जेव्हा शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस महाराष्ट्रात युती सरकार स्थापन करण्यावर चर्चा करत होते, तेव्हा अजित पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी २३ नोव्हेंबर २०१९ च्या पहाटे एका समारंभात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. होते. मात्र, हे सरकार केवळ ८० तास चालवू शकले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!