Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HingoliNewsUpdate : ऊस तोड महिला कामगारांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी

Spread the love

हिंगोली / प्रभाकर नांगरे : हिंगोली जिल्ह्यातील उगम ग्राम विकास संस्थाचे अध्यक्ष तथा गोविंद भाईश्रॉफ पद्यमभूषण  पुरस्कार प्राप्त  जयाजी पाईकराव यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस तोड महिला कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांना देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील विविध गावांमध्ये महिला सभा घेण्याबाबत, ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदींनुसार घ्यावयाच्या चार ग्रामसभांपैकी एक ऑक्टोबर महिन्यात घेणे अपेक्षित असते तसेच प्रत्येक ग्राम सभेच्या पूर्वी महिला सभा घेणे अनिवार्य आहे.


याच तरतुदीला अनुसरूनहिगोली जिल्ह्यातील महिला ऊसतोड कामगार विविध गावांमध्ये खालील विषयांवर चर्चा व निर्णय होण्यासाठी १७  सप्टेंबर (मराठवाडा मुक्ती दिन) च्या अनुषंगाने महिला सभा व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत.
सदर महिला सभेमध्ये खालील विषयावर सविस्तर चर्चा व ठराव व्हावे असे अपेक्षित आहे.

१) ऊसतोड कामगारांची नोंदणी होणे त्यांना विविध सोयी सुविधा व हक्क मिळण्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. परंतु ऊसतोड कामगारांची नोंद होताना महिला ऊसतोड कामगारांची नोंदणी स्वतंत्र ऊसतोड कामगार म्हणून होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात जवळपास ८ ते १० लाख ऊसतोड कामगारांपैकी निम्म्या महिला आहेत ज्याच्यांशिवाय कोयता तयार होऊ शकत नाही आणि ऊसतोडीचे काम होऊ शकत नाही. कोयत्याचा निम्मा हिस्सा असणाऱ्या आणि अधिक कष्ट करणाऱ्या महिलांची नोंदणी ऊसतोड कामगारांची पत्नी म्हणून न होता स्वतंत्र कामगार म्हणून व्हावी व त्यांना स्वतंत्र कामगार म्हणून ओळखपत्र देण्यात यावे.

(२) आपल्यागावामधीलगाव आरोग्य पाणीपुरवठा व स्वच्छता समितीवर आमच्या महिला ऊसतोड कामगार प्रतिनिधीला सदस्य म्हणून घेण्यात यावे.

३) आपल्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र- आरोग्य वर्धिनी केंद्र पातळीवरील जन आरोग्य समितीवर
ऊसतोड कामगार प्रतिनिधीला सदस्य म्हणून घेण्यात याव्या. तरी महिला ऊसतोड कामगारांच्या या प्रयत्नांना आपले ही सहकार्य मिळावे व आपल्या कडून याबाबत सूचना जाव्यात अशा अश्याचे निवेदन देण्यात आले.

यावेळी  छाया पडघन जिल्हा समन्वयक हिंगोली, कोमल चव्हाण तालुका समन्वयक कळमनुरी,  शारदा तांबरे तालुका समन्वयक हिंगोली, अर्चना सभादिंडे तालुका समन्वयक औंढा नागनाथ,  कलावती सवंडकर तालुका समन्वयक वसमत ,  सुधीर सभादिंडे, समाजिक कार्यकर्ते शिंदे वसमत, भीम आर्मीचे आनंद खरे, ज्येष्ठ पत्रकार तथा सामजिक कार्यकर्ते प्रभाकर नांगरे आदीं कार्यकर्ते उपस्थित होते .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!