AurangabadCrimeUpdate : अल्पवयीन भाचीचे लैंगिक शोषण करुन मामा फरार

औरंगाबाद – रमजानसाठी बहीणीकडे आलेल्या भावाने सतत तीन दिवस १३वर्षाच्या भाचीचे लैंगिक शोषण करंत पोबारा केला. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात मंगळवारी पोक्सो व बलात्काराचा गुन्हा आरोपी मामाच्या विरोधात दाखल झाला आहे.
आरेफ शहा (३५) रा. कटकटगेट असे फरार आरोपीचे नाव आहे. २५तारखेला आरोपी शम्सनगर उस्मानपुरा येथील सावत्र बहीणीकडे रोजा सोडायला आला होता. पण त्याचवेळेस त्याची नजर १३ वर्षाच्या अल्पवयीन भाचीवर पडली.त्याच दिवशी तीनदा आरेफ शहाने बलात्कार केला. नंतर पिडीतेला त्रास होत असल्यामुळे आईने विचारताच खरा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिस निरीक्षक गिता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गायकवाड तपास करंत आहेत.