Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

GunratnaSadavarteNewsUpdate : गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात सकल मराठा मोर्चाचीही उडी , वकिलीची सनद रद्द करण्याची मागणी

Spread the love

सोलापूर  : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते  यांच्या विरोधात मराठा आरक्षण प्रकरणात आंदोलन करणाऱ्या सकल मराठा  मोर्चानेही सोलापुरातील चावडी पोलीस ठाण्यात सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. सदावर्ते यांची वकिलीची सनद रद्द करावी, अशी मागणी सकल मराठा  मोर्चाच्या वतीने करण्यात आली असून त्यांची  सनद रद्द न केल्यास राज्यभरात आंदोलन केले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.

साताऱ्या प्रमाणेच सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यातही  छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्या प्रकरणी सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मराठा सकल मोर्चाचे समन्वयक माऊली पवार यांच्याकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. १० ऑक्टोंबर २०२० रोजी न्यूज १८ लोकमत या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गुणरत्न सदावर्ते यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अपशब्दांचा वापर केला होता असे या तक्रारीत म्हटले आहे. तर दुसरीकडे, वकील सदावर्ते यांची सनद रद्द करावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मराठा सकल मोर्चाचे समन्वयक माऊली पवार यांनी केली आहे.

दरम्यान मराठा आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात तक्रार करणाऱ्या आणि शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याच्या कटाचा मुख्य सुत्रधार असलेल्या अॅड. गुणरत्न‌ सदावर्ते व त्यांची पत्नी‌ अॅड. जयश्री पाटील ‌यांची वकिलीची सनद रद्द करावी, अशी मागणी मराठा ठोक क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी केली. महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलकडे तशी त्यांनी लेखी तक्रार केली आहे. या तक्रारी नंतर सदावर्ते यांच्यापुढील अडचणी आणखी वाढल्या आहेत. सदावर्ते यांनी एसटी आंदोलना दरम्यान वकिली व्यवसायाचा दुरोपयोग करून कामगारांकडून पैसे उकळल्याचाही तक्रार केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!