Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

GunratnSadavarteNewsUpdate : आता पुणे पोलिसांनाही हवा आहे गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले असल्याचे आता उघडकीस येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी केलेल्या हिंसक आंदोलनानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह १०९ आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात असले तरी त्यांच्या विरोधात कोल्हापूर , अकोला पाठोपाठ पुणे येथेही गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्यांनाही सदावर्ते यांचा ताबा हवा असल्याचे सांगण्यात येत आहे. 

दरम्यान सिल्व्हर ओक वरील आंदोलन प्रकरणात आपला नव्हे तर गुणरत्न सदावर्ते यांचाच सहभाग असल्याची कबुली या आंदोलन प्रकरणात अटकेत असलेल्या चार आरोपींपैकी दोन आरोपींनी दिली आहे अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशी अशी या आरोपींची नावे आहेत.पोलिसांना दिलेल्या जबाबात त्यांनी म्हटले आहे कि , या प्रकरणात आमचा काही रोल नाही. आम्ही आरोपी नाही, सगळे सदावर्ते यांनी केले आहे . दरम्यान शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेतील आरोपी अभिषेक पाटील आणि संदीप गोडबोले यांच्यातील फोन संभाषण मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहे. पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर या दोघांनी एकमेकांशी फोनवरुन संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. या आंदोलकांना तिकीटासाठी पैसे दिल्याचा उल्लेख अभिषेक आणि संदीप यांच्यातील फोन संभाषणामध्ये आढळून आला आहे.

Advertisements

दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सातारा पोलिसानंतर पुढे पुणे पोलिसही गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्याची शक्यता आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात ९ सप्टेंबर २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पुणे पोलीस त्यांना अटक करण्याची शक्यता आहे. पोलिसांनी यासंदर्भातील अहवाल शासनास पाठवला आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!