Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

GunratnaSadavarteNewsUpdate : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा मिळविण्यासाठी अकोट पोलिसही न्यायालयात

Spread the love

अकोला : मुंबई , सातारा , कोल्हापूरपाठोपाठ आता अकोला जिल्ह्यातील अकोट पोलिसांनाही अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा  ताबा हवा असल्याचे वृत्त आहे. या पोलीस ठाण्यात यांच्यासह अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते , त्यांची पत्नी अ‍ॅड. जयश्री पाटील, औरंगाबादचा अजयकुमार गुजर आणि बस वाहक प्रफुल्ल गावंडे यांच्याविरोधात  फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे याबाबतचा तक्रार अर्ज जानेवारी महिन्यात दिला होता मात्र पोलिसांनी ११ एप्रिल रोजी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. 

दरम्यान या प्रकरणातील अजयकुमार गुजर आणि प्रफुल्ल गावंडे यांना आज दुपारी ३ वाजता अकोट न्यायालयात हजर करण्यात आले असून  अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तें यांचा  ताबा घेण्यासाठी अकोट पोलीस आजच  न्यायालयात अर्ज दाखल करणार आहे. अशी माहिती अकोट शहर पोलीस स्टेशनचे प्रकाश अहिरे यांनी दिली.

काय आहे प्रकरण ?

अकोट शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी  दिलेल्या माहितीनुसार अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह त्यांची पत्नी अ‍ॅड. जयश्री पाटील, औरंगाबादचा अजयकुमार गुजर आणि प्रफुल्ल गावंडे यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांकडून ३०० ते ४०० रुपये गोळा करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. तब्बल ७४ हजार कर्मचाऱ्यांना फसवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.  न्यायालयात प्रकरण दाखल करण्यासाठी हे पैसे गोळा केल्याचे सांगण्यात आले आहे. काल शुक्रवारी या प्रकरणातील आरोपी अजयकुमार गुजर आणि बस वाहक प्रफुल गावंडे यांना ताब्यात घेतले असून उशिरा रात्री त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर अकोट शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात मालोकार यांनी अकोट पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. त्यानंतर ११ एप्रिल रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल काण्यात आला आहे.

संपकरी कर्मचाऱ्यांना निलंबित व बदली करण्याचे आदेश राज्य परिवहन प्रशासनाने काढले त्यातून सुटका व्हावी व आपल्यावरील उपरोक कार्यवाही रद्द व्हावी याकरीता कर्मचाऱ्यांमार्फत प्रयत्न सुरु झाले होते. कर्मचाऱ्यांच्या सदर अडचणीचा गैरफायदा घेऊन अजयकुमार बहादरसिंग गुजर आणि अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात प्रकरण दाखल करून प्रशासनाद्वारे होत असलेली उपरोक्त कार्यवाही रद्द करुन देतो, अशा खोटया भुलथापा देऊन कर्मचाऱ्यांकडून रक्कम जमा करण्यात आली  असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रमाणे अकोट आगाराचे गजानन रामभाऊ बढे (रा. कृष्णकलनी अकोला रोड, अकोट) आणि अकोट आगाराच्या इतर कर्मचाऱ्यांद्वारे संकलीत केलेले ७४ हजार ४०० रुपये १४ नोव्हेंबर २०२१ रोजी अकोट डेपो येथे म्हणून नेमणूकीवर असलेले प्रफुल गावंडे यांनी अजयकुमार गुजर यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले असल्याचे निदर्शनास आले आहे.

न्यायालयीन लढ्यासाठी दिले पैसे…

दरम्यान या प्रकरणातील  आरोपी प्रफुल गावंडे यांनी काल आत्मसमर्पणपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले कि ,  एसटी कर्मचाऱ्यांच्या न्यायालयीन लढ्यासाठी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करण्याचे आवाहन अजय गुजर याने केले होते. त्यांनी सदावर्तेंसोबत कॉन्फरन्स कॉलवर बोलणेही करून दिले होते. त्यांच्या आवाहनावरून अकोट आगारातील कर्मचाऱ्यांकडून ७४ हजार ४०० रुपये गोळा करण्यात आले. गुजर यांनी सांगितल्याप्रमाणे ऑनलाइन पैसे त्यांना पाठवण्यात आले. कर्मचाऱ्यांमध्ये माझ्याच मोबाईलमध्ये फोन-पे अकाऊंट असल्याने ‘मी’ पैसे वळते केले. यापेक्षा प्रकरणामध्ये माझा कुठलाच संबंध नसल्याचे प्रफुल्ल गावंडे यांनी स्पष्ट केले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!