Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

KolhapurElectionUpdate : ताजी बातमी : भाजपला धोबीपछाड देत जयश्री जाधव यांनी मारली बाजी …

Spread the love

कोल्हापूर  : उत्तर कोल्हापूर विधानसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला धोबीपछाड देत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी बाजी मारली आहे. जयश्री जाधव या काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी आहेत. काँग्रेसकडून हि जागा हिसकावण्यासाठी भाजपने बरेच प्रयत्न केले . परंतु  अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीमध्ये काँग्रेसला गड राखण्यात यश आले आहे.निवडणूक पार पडल्यानंतर आज मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली होती आणि ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. या निवडणुकीत भाजप उमेदवार सत्यजीत कदम यांचा पराभव झाल्याने चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. 

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या जयश्री जाधव या ९६, २२६ इतक्या मतांनी विजयी झाल्यात तर भाजपच्या सत्यजित कदम यांना ७७, ४२६ इतकी मत मिळाली आहे. पहिल्या फेरीतच काँग्रेसच्या जयश्री जाधव २१३७ मतांनी आघाडी घेतली. पहिल्या फेरी अखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ४८५६ तर भाजपच्या सत्यजीत कदम यांना २७१९ मते मिळाली. सतेज पाटील यांच्या कसबा बावड्यातून काँग्रेसने ही आघाडी घेतली.

विशेष म्हणजे  विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक प्रचार करून भाजपनेत्यांची मोठी फौज प्रचारासाठी मैदानात उतरवली होती. दरम्यान या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या आशीर्वादानंतर कोल्हापुरातही अंबाबाईचा आशीर्वाद मिळेल असा विश्वास फडणवीस यांनी प्रचारादरम्यान दाखवला होता. पण तरीही या निवडणुकीमध्ये भाजपला पराभव पत्करावा लागला आहे.

दरम्यान या निवडणुकांमध्ये भाजपकडून हिंदुत्व आणि स्वाभिमान असे मुद्दे प्रचारात आले होते त्यामुळे काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी आपले हिंदुत्व आणि स्वाभिमान विजयी झाला, अशी प्रतिक्रिया दिली आहे. यातून भाजपच्या विरोधात महाविकास आघाडीने जोरदार लढत दिली आहे. अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या विरोधात आपले टीकास्त्र सोडत भाजप म्हणजे हिंदुत्व नाही हे ठणकावून सांगितले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!