Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : २७ वर्षांच्या ‘लिव्ह अँड रिलेशनशिप’ प्रकरणामुळे भाजपचे ‘हे’आमदार महोदय आले अडचणीत … !!

Spread the love

नवी मुंबई : तब्बल २७ वर्षे लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर झालेल्या मुलाचा स्वीकार करून त्याचे पितृत्व स्वीकारण्यास नकार देऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात नेरुळ पोलिसांत तक्रार दिल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे.  या प्रकरणामुळे आमदार गणेश नाईक अडचणीत सापडले आहेत.

या प्रकरणाची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि ,  सीबीडी पोलीस ठाण्यात दिपा चौहान या महिलेकडून गणेश नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील २७ वर्ष गणेश नाईकांचं महिलेसोबत लिव्ह अँड रिलेशनशिप होती. एवढंच नाहीतर त्यातून त्यांना एक मुलगाही झाला. मात्र या मुलाचे पितृत्व स्वीकारण्यास नकार देत आपणास  जिवे  मारण्याची धमकी दिल्याचा  गंभीर आरोप या महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे.

डीएनए चाचणीची मागणी

गणेश नाईक यांनी २०२१ मध्ये सीबीडी येथील आपल्या कार्यालयामध्ये मला बोलावले होते. त्यावेळी गणेश नाईक यांनी डोक्यावर बंदूक ठेवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती अशी तक्रार या महिलेने नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली  परंतु त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे पीडित महिलेनं महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहे. तर, गणेश नाईक यांची डीएनए चाचणी करावी अशी मागणीच शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!