MaharashtraNewsUpdate : १ एप्रिलपासून राज्यातील सर्व निर्बंध होताहेत शिथिल : राजेश टोपे

जालना : राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याने केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे १ एप्रिलपासून कोरोनासंबंधीचे सर्व निर्बंध मागे घेण्यात येणार आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली आहे. १ एप्रिलपासून आपत्कालीन कायदा मागे घेण्यासाठी प्रक्रिया सुरू होईल. पण असे असले तरीही मास्क वापरणं हे अनिवार्य आहे. मास्कशिवाय कोणीही बाहेर फिरताना दिसेल तर त्यांच्यावर कारवाई होईल अशीही माहिती राजेशयांनी दिली आहे.
यावेळी लसीकरणाच्या बाबतीत चलढकल नको, अशा सूचना राजेश टोपे यांनी दिल्या आहे. लोकांकडून वारंवार रेल्वे, बस, मॉल्स यासंबंधी निर्बंध शिथील करण्याच्या मागण्या आल्या. त्यावर आता सकारात्मक विचार करण्यात आला असून १ एप्रिलपासून करोनाचे सर्व निर्बंध काढण्यात आले आहेत. पण मास्कची सक्ती मात्र कायम आहे. दरम्यान १४ एप्रिल , डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्याचे आवाहनही टोपे यांनी केले आहे.