Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BankNewsUpdate : एप्रिलमध्ये येताहेत सर्वाधिक बँकांना १५ सार्वजनिक सुट्या

Spread the love

मुंबई : यावर्षी एप्रिलमध्ये सर्वाधिक १५ सार्वजनिक सुट्या येत आहेत . नवीन आर्थिक वर्ष एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्याचवेळी बँकेच्या सुट्ट्यांसह महिना सुरू होत आहे. एप्रिलच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात सलग तीन दिवस बँका बंद राहतील. त्यामुळे तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असल्यास ते उद्यापर्यंत गुरुवारी ३१ मार्च पूर्ण करा, नाहीतर तुम्हाला बराच वेळ प्रतीक्षा करावी लागू शकते.


बँक सलग ३ दिवस बंद राहतील

१ एप्रिल – बँक खात्यांचे वार्षिक बंद (क्लोजिंग)
२ एप्रिल – गुढी पाडवा
३ एप्रिल – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एप्रिल २०२२ च्या बँक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीनुसार देशभरात विविध ठिकाणी एप्रिलमध्ये एकूण १५ दिवस बँका बंद राहणार आहेत. तर महाराष्ट्रात १० दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे.

सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे –

१ एप्रिल : बँक खात्यांचे वार्षिक बंद (क्लोजिंग)
२ एप्रिल : गुढी पाडवा आणि इतर प्रादेशिक सण
३ एप्रिल : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
९ एप्रिल : महिन्याचा दुसरा शनिवार
१० एप्रिल : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
१४ एप्रिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती/ महावीर जयंती/ बैसाखी/ तमिळ नववर्ष दिन/ चेराओबा/ बिजू उत्सव/ बोहाग बिहू
१५ एप्रिल : गुड फ्रायडे/ बंगाली नवीन वर्षाचा दिवस (नबावर्षा) / हिमाचल दिवस/ विशू/ बोहाग बिहू
१७ एप्रिल : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
२३ एप्रिल : महिन्याचा चौथा शनिवार
२४ एप्रिल : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!