Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : पोलिसांनी मोठ्या कष्टाने “त्या ” भामट्याला आणले खरे पण पुन्हा छत्तीसगड कारागृहात रवाना करावे लागले !!

Spread the love

औरंगाबाद – औरंगाबादसह छत्तीसगड, गुजराथमधे फसवणूकीचे गुन्हे दाखल असलेला व छत्तीसगड कारागृहात असलेला आरोपी आर्थिक गुन्हे शाखेने मोठ्या कष्टाने तपासासाठी वर्ग करुन आणला खरा पण न्यायालयाकडून त्याला एका दिवसाचीही  पोलिस कोठडी न मिळाल्यामुळे  अखेर आल्या पावली आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना  त्याची रवानगी छत्तीसगड कारागृहात करण्याची नामुष्की आली.


अनिल राजदयाल राय असे या भामट्याचे नाव आहे. वर्षभरापासुन आर्थिक गुन्हेशाखा त्याचा कसून शोध घेत होती.शेवटी सहाय्यक पोलिसआयुक्त विशाल ढुमे यांना खबर मिळाली की, तो छत्तीसगडच्या न्यायालयीन कोठडीत आहे.या प्रकरणी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन आर्थिक गुन्हेशाखेचे एक पथक ढुमे यांनी छत्तीसगडला पाठवले.पण त्याचा फारसा उपयोग शहर पोलिसांना झाला नाही. आरोपी अनिल राजदयाल राय याने फिर्यादी देवराम संताराम चौधरी(३६) यांना गंडवले.चौधरींची सोनालिका मेटल कार्पोरेशन नावाची मुंबईत कंपनी आहे.चौधरींना अनिल राय याने ६कोटी ७८ लाखांना फसवले.या प्रकरणी वाळुज औद्योगिक पोलिस ठाण्यात २३फेब्रु. २१ रोजी गुन्हा दाखल आहे.

काय आहे गुन्ह्याचे स्वरूप ?

आरोपी राय याची औरंगाबादेत वाळुज औद्योगिक परिसरात आॅर्बिट इलेक्र्टोमेट इंडीया प्रा. लिमिटेड नावाची कंपनी आहे. रायने २०१७ साला पासुन चौधरी यांच्या सोनालिका मेटल कार्पोरेशन कडून स्टेलनेस स्टील ची खरेदी केली.पण त्याचे रुपये अदा केले नव्हते. त्याबदल्यात चौधरी यांना आरोपी रायच्या कंपनीत संचालक म्हणून पार्टनरशीप देण्यासाठी आग्रह केला. चौधरींही राय याच्या भूलथापाला बळी पडले.
राय ने गोडबोलून चौधरी यांच्या कंपनीचे कोरे लेटर पॅड व काही कोर्‍या चेकवर सह्या घेतल्या व ३५लाख रु.चे शेअर्स घ्यायला लावले.पण त्याचा गैरवापर करत अनिल रायने चौधरी यांना संचालक केले व दूरही हटवले आणि  शेअर्स ही परस्पर आपल्या नावे करुन घेतले.

आर्थिक गुन्हे शाखेने घेतले परिश्रम

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासुन राय फरार होता. दरम्यान एपीआय तृप्ती तोटावार यांनी पोलिसउपायुक्त अपर्णा गिते यांचे मार्गदर्शन घेत अनिल राय चे लोकेशन दोन आठवड्यापूर्वी शोधले तेंव्हा  छत्तीसगड मधील भिलाई जिल्ह्यातील दुर्ग कारागृहात तो फसवणूकीच्या आरोपाखाली शिक्षा भोगंत असल्याचे निष्पन्न झाले. हि माहिती मिळताच उपायुक्त गिते यांच्या  मार्गदर्शनाखाली एपीआय तोटावार यांनी दुर्ग कारागृहातून आरोपी राय ला पुढील तपासासाठी वर्ग करुन औरंगाबादेत आणले.या कारवाईत त्यांच्या सौबत पोलिस कर्मचारी विठ्ठल मानकापे,संदीप जाधव, बाबासाहेब भानुसे हे होते.  राय याच्यावर वाळुज औद्योगिक पोलिस ठाण्यात एक सिडको पोलिस ठाण्यात दोन,  बडोदा गुजराथ येथे एक  आणि छत्तीसगड पोलिसांकडे दोन गुन्हे दाखल आहेत. तर चेक बाऊन्स प्रकरणी अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांनी या प्रकरणात उपायुक्त गिते यांना कारवाईचे निर्देश दिले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!