AurangabadCrimeUpdate : बोगस नोटा देत दारू खरेदी करणाऱ्या ५ आरोपीना बेड्या, पाच दिवस पोलीस कोठडी

औरंगाबाद – बोगस नोटा देत दारू खरेदी करणाऱ्या ५आरोपीना पुंडलिकनगर पोलिसांनी सापाला रचत अटक केली. दोन महिन्यांपासून रेकॉर्डवरच्या आरोपीने नवे साथीदार सोबत घेऊन बनावट नोटा चलनात आणणाऱ्या चौघांना पुंडलिक नगरपोलीसांनी अटक केली कोर्टाने आरोपिंना ३ जानेवारी २०२२ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यांचा ताब्यातून ३ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये प्रिंटर, कॉम्प्युटर, कटर,५००,१००,आणि ५० रुपयांचे बोगस १लाख २० हजार रु. इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.अशी माहिती सहाय्य्क पोलीस निरीक्षक शेषराव खटाने यांनी दिली.
समरान उर्फ लक्की रशीद शेख (३०) रा.जसवनत पुरा नेहरूनगर ,नितीन कल्याण चौधरी,रा. मुकुंदवाडी, अक्षय अंन्ना पडूळ , दादा पोपट गावंडे (४२),रघुनाथ चैनदास ढवळपुरे (४९) तिघेही रा. गजानननगर अशी अटक आरोपीची नावे आहेत.
२७ डिसेंबर ला खबऱ्याने पुंडलिकनगर पोलिसांना माहिती दिली होती की, बनावट नोटा देऊन पुंडलिकनगरच्या सुपर वाईन्स दुकानात दारू खरेदी केली जात आहे.त्यानुसार एपीआय खताने यांनी २८ डीसेंबर रोजी रघुनाथ ढवळपुरे याला ताब्यात घेतले. त्याने रेकॉर्डवरचा आरोपी समरान ने सांगितल्यावरून करत असल्याची कबुली दिली. व मुकुंदवाडीतील गून्हा करत असलेल्या किरायाच्या घरात पोलिसांना नेऊन वरील सर्व वस्तू पोलिसांच्या हवाली केल्या. समरान हा प्रत्येक वेळी नवे साथीदार सोबत घेऊन बनावट नोटा तयार करतो अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली. वरील कारवाई पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गांगुर्डे , एपीआय खटाणे , एएसआय रमेश सांगळे, बाळाराम चौरे, गणेश डोईफोडे, अजय कांबळे यांनी पार पाडली