AurangabadCrimeUpdate : ‘त्या’ बलात्कार प्रकरणातील फरार कॉलेजकुमारास अटक

औरंगाबाद : दोन महिन्यांपूर्वी बंद पडलेली स्कूटर सुरु करून देत अल्पवयीन पीडितेच्या आईला फोन लावून मदत केल्याचा गैरफायदा घेत कॉलेजकुमारने अल्पवयीन तरुणीशी ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत शोषण केले.व पीडितेला दिवस गेल्याचे कळताच फरार झालेल्या कॉलेजकुमारला जिंतूर येथून पोलिसांनी अटक करून आणले आहे. या प्रकरणी वाळूज औद्योगिक पोलीस ठाण्यात कॉलेजकुमारा विरुध्द्व बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
अरविंद सदावर्ते हल्ली मुक्काम . बजाजनगर रा, जिंतूर असे आरोपीचे नाव आहे. दोन महिन्यांपूर्वी पीडितेची दुचाकी रस्त्यात बंद पडली तेव्हा आरोपी रस्त्यातून जात होता. त्याने मदत करत पीडितेच्या आईला फोन लावून दिला त्यावेळी आईही घटनास्थळी आली व पीडितेची दुचाकी घेऊन गेली त्यामुळे पीडितेचा नंबर आरोपी कडे आला होता. सदावर्ते याने ओळख वाढवून पिडीतेचे शोषण केले. व व्हिडीओ क्लिप तयार करत त्रास दिला . हा प्रकार उघडकीस आल्यावर पीडितेच्या आईने वाळूज औद्योगिक पोलीस ठाणे गाठून सदावरतेच्या विरोधात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले करत आहेत