Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsUpdate : सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून मिलिंद एकबोटे, कालिचरणसह सहा जणांविरुद्ध गुन्हा

Advertisements
Advertisements
Spread the love

पुणे : समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद एकबोटेसह सहा जणांविरोधात खडक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील नातूबाग येथे १९ डिसेंबरला शिव प्रताप दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Advertisements

या प्रकरणी कॉन्स्टेबल सोमनाथ ढगे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार समस्त हिंदू आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद एकबोटे, मोहनराव शेटे, दीपक बाबुलाल नागपुरे, कालीचरण महाराज, कॅप्टन दिग्रेंद्र कुमार आणि नंदकिशोर रमाकांत एकबोटे या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे खडक पोलिसांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ डिसेंबर रोजी नातूबाग येथे शिव प्रताप दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्माच्या भावना दुखावल्या जातील,तसेच धार्मिक श्रद्धेचा अपमान करून समाजात तेढ निर्माण होईल, असे चिथावणीखोर भाषण मिलिंद एकबोटे यांनी केले. तसेच नंदकिशोर रमाकांत एकबोटे यांनी देखील सूत्रसंचालन करतेवेळी भडकाऊ आणि चिथावणीखोर वाक्यप्रयोग केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!