Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : अहो आश्चर्यम !! व्हॅक्सीनेशन सर्टफिकेट मुळे सापडला खुनी

Spread the love

औरंगाबाद – दौलताबादच्या करोडी शिवारातील महिलेचा खुनी व्हॅक्सीनेशनच्या सर्टफिकेटवरील नंबरमुळे ट्रेस झाला व सापडला.अशी माहिती पोलिसआयुक्तालयातील वरिष्ठ सुत्रांनी दिली.
सचिन मनचक नरवडे(२४)रा.करोडी याला गुन्हेशाखेने त्याचे मुळ गाव गुंडा ता.जि.परभणी येथून ताब्यात घेत दौलताबाद पोलिसांच्या हवाली केले.

दौलताबाद पोलिसांनी अटकेची प्रक्रिया पूर्ण केली. गुन्हेशाखा, आणि दौलताबाद पोलिस वरील आरोपींचा समांतर पणे शोध घेत होते.त्यांच्या तपासात सायबर पोलिस ठाण्याची मदत झाली. दौलताबाद पोलिसांनी फरार आरोपीच्या खोलीची झडती घेतली तेंव्हा आरोपी सचिन नरवडे चे ३०ते४०मोबाईल नंबर सापडले.सगळे नंबर ट्रेस केल्यावरही आरोपी सापडंत नव्हता. शेवटी नुकतेच कोव्हिड चे लसीकरण केल्याचे आरोपीचे सर्टफिकेट पोलिसांना मिळाल्यानंतर तो नंबर सुरु असल्याची खात्री पोलिसांनी करुन घेतली. तरीही आरोपीने बंद करुन ठेवला होता. नंबर सुरु होताच आरोपी परभणी जिल्ह्यात ट्रेस झाला. दरम्यान जालन्यापर्यंत गुन्हेशाखेची टीम आरोपीच्या मागावर पोहोचली होतीच.

सायबर पोलिस ठाण्याने आरोपीला व्हॅक्सीनेशन सर्टफिकेटवरुन ट्रेस केल्याची माहिती पोलिसउपायुक्त उज्वला वानकर यांनी पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांना दिल्यानंतर दौलताबाद पोलिसांचे पथक आरोपी सचिन नरवडे ला पाठवण्याकरता तयार होते.पण गुन्हेशाखेची टीम जालन्यापर्यंत गेलेली होतीच म्हणून पोलिसआयुक्तांनी गुन्हेशाखेलाच पुढे परभणी पर्यंत पाठवत आरोपीला ताब्यात घेण्याचे अदेश दिले.त्यानुसार पोलिसनिरीक्षक अविनाश आघाव यांनी पीएसआय अमोल म्हस्के यांच्या पथकाला सुचना देत आरोपी ताब्यात घेतला. आरोपी सचिन ने पोलिसांना गुन्ह्याची कबुली देतांना सांगितले की, १४डिसेंबर ला मयत बरडाबाई नरवडे हीने तिची बाज चोरल्याचा आरोप ठेवत खुप चिडली होती.त्यामुळे संतापलेल्या सचिनने एक लोखंडी राॅडचा फटका मारुन त्या ठिकाणाहून पळ काढला. त्यानंतर पोलिस तपासात उघंड झाले की,बरडाबाईचा मुलगा ऊस तोडीसाठी बाहेर गेलेला होता.त्याने १६तारखेला आईला फोन लावला पण आई फोन उचलंत नाही.त्याच भागात बकर्‍या चारणार्‍या माणसाला त्याने घरी पाठवले.तेंव्हा बरडाबाई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.ही माहिती दौलताबाद पोलिसांना त्या बकर्‍याचारणार्‍या इसमाने दिली.आरोपीचा जबाब नोंदवल्यानंतर आज सकाळी आरोपी सचिन (रविवारी) दौलताबाद पोलिसांच्या हवाली केला.

या कारवाईत दौलताबाद पोलिसांनी आरोपीचा सुरु असलेला मोबाईल नंबर सायबर पोलिस ठाण्याच्या मदतीने ट्रेस केला.तर गुन्हेशाखेने आरोपी जेरबंद केला. वरील कारवाईत पोलिसआयुक्त डाॅ निखील गुप्ता, पोलिसउपायुक्त उज्वला वाणकर, अपर्णा गिते, सहाय्यक पोलिसआयुक्त विवेक सराफ, विशाल ढुमे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, राजश्री आडे, गौतम पातारे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अमोल म्हस्के एऐसआय सतीश जाधव पोलिस कर्मचारी रविंद्र खरात, सुनिल बेलकर यांनी पार पाडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!