Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathawadaNewsupdate : परभणी जिल्ह्यातील ‘या’ भाजप नेत्याने घेतला मोठा निर्णय

Spread the love

परभणी : भारतीय जनता पार्टीचे जिंतूर (परभणी जिल्हा) तालुकाध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांनी आज तालुकाध्यक्षसह भाजपच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. भाजपा ओबीसी मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाजाला न्याय देवू शकत नसल्याने आपण राजीनाम्याचा निर्णय घेतला असून कार्यकर्त्यांशी चर्चा करून कुठल्या पक्षात जायचे याचा निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राजीनामा देत असल्याचं म्हणत त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

आपल्या राजीनाम्याचे कारण देताना ते म्हणाले कि , मी धर्मनिरपेक्ष कुटुंबातून पुढे आलेला व्यक्ती आहे. भाजपा हा ओबीसी, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाजाला न्याय देऊ शकत नाही अशी माझी धारणा झाली आहे. तसे अनुभव ही या दोन वर्षांत मिळाले आहे. त्यामुळे पक्षात माझ्या मनाची घुमसट होत आहे असा उल्लेख आपल्या राजीनामा पत्रात प्रताप देशमुख यांनी केला आहे.

दरम्यान येत्या दोन दिवसात सहकारी मित्र परिवारासोबत चर्चा करून पुढची राजकिय दिशा ठरवणार असल्याचे  त्यांनी सांगितले . प्रताप देशमुख हे राष्ट्रवादीकडून जिंतूरचे नगराध्यक्ष राहिले होते. जिंतूर शहरात प्रताप देशमुख यांचं मोठं राजकीय वजन आहे, त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. माजी आमदार विजय भांबळे यांच्यासोबत झालेल्या मतभेदानंतर देशमुखांनी राष्ट्रवादी सोडत भाजपात प्रवेश केला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!