Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : मोदींच्या गंगा स्नानावरूनही राहुल गांधी यांनी सोडले टीकास्त्र

Spread the love

अमेठी :  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि मोदींवर हल्ला चढवला आहे. आपल्या मागच्या भाषणातही त्यांनी हिंदू आणि हिंदुत्ववादी यावर आपले मत व्यक्त केले होता आज अमेठीत बोलतानाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या स्नानावरून हिंदू आणि हिंदुत्ववादी यावर भाष्य केले.

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी दौरा सध्या चर्चेत आहे. या घटनेवर बोलताना राहुल गांधी म्हणाले कि ,  ‘हिंदुत्ववादी एकटेच गंगेत स्नान करतात तर हिंदू मात्र करोडो श्रद्धाळूंसोबत गंगास्नान करतो’. गंगेत एकटीच व्यक्ती स्नान करतेय असे दृष्य मी प्रथमच पाहिले. त्यांनी  योगी आदित्यनाथ आणि राजनाथ सिंह यांनाही दूर ठेवले . ही गोष्ट बरेच काही सांगून जाणारी आहे, असा टोलाही राहुल यांनी लगावला. नरेंद्र मोदी यांनी लहान असताना म्हणे मगरीशी दोन हात केले होते. पण गंगास्नान घेताना तसे काहीच दिसले नाही. जी काही दृष्य पाहिली त्यावरून त्यांना पोहायला येत का, हाच मोठा प्रश्न आहे, अशी टोलेबाजीही राहुल यांनी केली.

राहुल गांधी आज अमेठीत दाखल झाले. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासोबत प्रतिज्ञा पदयात्रा काढत राहुल यांनी यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या पदयात्रेच्या निमित्ताने भाषण करताना राहुल यांनी भाजपवर जोरदार शब्दांत हल्ला चढवला. राहुल गांधी यांच्या प्रतिज्ञा पदयात्रेला अमेठीकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यात्रेला मोठी गर्दी झाली होती.

दरम्यान अमेठीकरांना खरे  कोण आणि खोटे  कोण हे आता कळले  आहे, असे त्यांनी पुन्हा एकदा  हिंदू आणि हिंदुत्ववादावर राहुल यांनी मोठे विधान केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य केले. सत्यासाठी लढतो, सत्याग्रही आहे तो हिंदू आणि द्वेष पसरवतो, सत्ताग्रही आहे तो हिंदुत्ववादी’, अशी व्याख्या करत राहुल यांनी निशाणा साधला. ‘हिंदू हा बंधुभाव जपणारा आहे. तो कुणाला घाबरत नाही. कितीही दबाव आला तरी त्यापुढे झुकत नाही. मात्र हिंदुत्ववाद्यांचे तसे नाही. ते दबावापुढे गुडघे टेकतात. नथुराम गोडसे हे त्याचे एक उदाहरण आहे. गोडसेला फाशीची शिक्षा सुनावली गेली तेव्हा तो लहान मुलासारखा रडत होता. दुसरीकडे गांधीजींना गोळी लागूनही ते ‘हे राम’ म्हणाले होते. वेदनेने एक टिपूसही त्यांच्या डोळ्यातून आले नाही. हीच हिंदूची खरी ओळख आहे’, असे राहुल म्हणाले.

मोदींच्या कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावरही राहुल गांधी यांनी हल्ला चढविला ते म्हणाले कि , ‘भाइयों-बहनों गलती हो गई’ असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पण हे साफ झूठ आहे. मोदी यांनी हे तीन कृषी कायदे असेच आणले नव्हते. देशातील मोठ्या उद्योगपतींसाठी हे सगळं घडवून आणलं होतं. देशातील शेतकऱ्यांच्या कष्टाची कमाई त्यांना उद्योगपतींकडे वळवायची होती. त्यासाठी हे कायदे जाणीवपूर्वक केले गेले होते. हे कायदे करण्यासाठी दबाव होता. म्हणूनच माझी चूक झाली असे मोदी आता म्हणत असतीलही पण त्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही’, अशी तोफ राहुल यांनी डागली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!