WinterSession2021 | #CurrentUpdate | देशात आतपार्यंत एकही ओमिक्रॉनचा रुग्ण नाही

केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी.
-
राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब
-
देशात आतपार्यंत एकही ओमिक्रॉनचा रुग्ण नाही, राज्यसभेत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची
-
संसद परिसरात विरोधकांचे गांधीजींच्या पुतळ्याजवळ आंदोलन, १२ खासदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी
Delhi | Opposition leaders protest at Mahatma Gandhi statue in Parliament premises over suspension of 12 MPs.
Opposition MPs staged walkout from Lok Sabha and Rajya Sabha after Rajya Sabha Chairman M Venkaiah Naidu rejected revocation of the suspension of 12 Opposition MPs. pic.twitter.com/t8T7XmDFKY
— ANI (@ANI) November 30, 2021
-
विरोधी पक्षांची १२ खासदारांचे निलंबन मागे मागणी राज्यसभेचे सभापती नायडू यांनी फेटाळली, विरोधकांचा सभात्याग
-
काँग्रेस, डीएमके आणि नॅशनल कॉन्फरन्सचा सभात्याग, लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब
-
राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांची घोषणाबाजी. नायडूंच्या कठोर भूमिकेमुळे विरोधी पक्ष आणखी आक्रमक, नायडू यांनी कारवाईचा इशारा दिला.
-
राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडूंनी विरोधकांना फटाकरले. खासदारांना निलंबित करण्याचा निर्णय आपला. १० ऑगस्टला आपण त्या सदस्यांची नावे उच्चारली होती. त्यांना जागेवर बसण्यास सांगितले होते, असे नायडू म्हणाले. नायडू बोलत असताना विरोधकांचा गदारोळ.
-
१२ खासदारांचे निलंबन मागे घ्यावे… ही घटना मागील अधिवेशनात घडली होती. यामुळे या अधिवेशनात कसा काय निर्णय घेऊ शकताः खर्गे
-
राज्यसभेत खासदारांच्या निलंबनाचा मुद्दा उपस्थित. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जु खर्गेंनी खासदारांच्या निलंबनाचा मुद्दा उपस्थित केला. विरोधी पक्षनेत्याला मुद्दा मांडण्यास परवानगी दिली गेली नाही. हे नियमांविरोधात आहेः खर्गे
-
दुसऱ्या दिवशीही संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये विरोधकांचा गोंधळ. लोकसभेत नव्या खासदारांनी गदारोळातच घेतली शपथ. राज्यसभेत सभापतींच्या सूचनेवरून सरकारने दस्तावेज सादर केली.
-
सभागृहातील असभ्य वर्तनावर विरोधकांनी माफी मागावी आणि खेद व्यक्त करावा. पण त्यांनी आमचे म्हणणे फेटाळून लावले. यामुळे नाईलाजास्तव निलंबनाचा निर्णय घ्यावा लागला. त्यांनी सभागृहात माफी मागावीः प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री
-
१२ खासदारांचे निलंबन मागे न घेतल्यास विरोधक राज्यसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार
-
काँग्रेस आणि शिवसेनेते इंधन दरवाढीवरून चर्चेची मागणी करत लोकसभेत दिली नोटीस
-
विरोधी पक्षांना ज्या मुद्द्यावर चर्चा हवी आहे, त्या सर्व मुद्द्यांवर चर्चेसाठी सरकार तयार आहे. त्यासाठी नोटीस दिली जाते. सरकारने कधीच चर्चेसाठी नकार दिला नाहीः मुख्तार अब्बास नक्वी, केंद्रीय मंत्री
-
काळे कृषी कायदे मंजूर केले तेव्हाही हुकूमशाही होती आणि कायदे मागे तेव्हाही हुकूमशाही आहेः संजय सिंह, खासदार आम आदमी पार्टी
-
१२ खासदारांच्या निलंबनानंतर पुढील रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्तितीत बैठक झाली.