Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : छेड छाडीच्या भीतीने विद्यार्थिनीने धावत्या रिक्षातून घेतली उडी , फरार रिक्षा चालकाच्या आवळल्या मुसक्या

Spread the love

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात सकाळी क्लासेसला जाणाऱ्या एका विद्यार्थिनीने रिक्षाचालकाच्या संशयास्पद हालचालीला घाबरून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावत्या रिक्षातून उडी मारण्याची धक्कादायक घटना जालना रोडवर घडली. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्षदर्शींनी ऑटो रिक्षातून उडी घेतलेल्या जखमी मुलीला मदत करून कुटुंबियांना बोलावले आणि तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तत्काळ उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजच्या आधाराने शोध घेऊन अखेर रिक्षा चालक आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आनंद पहुळकर असे रिक्षाचालकाचे नाव आहे. मोंढा नाका परिसरातून क्लालेसला जाण्यासाठी हि मुलगी निघाल्यानंतर रिक्षाचालक आपली छेड काढत असल्याचे लक्षात येताच तिने रिक्षाचालकाला रिक्षा थांबविण्याची विनंती केली परंतु रिक्षा न थांबवता त्याने जोरात रिक्षा पाठविण्यास सुरुवात केली. अखेर या प्रकारातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी तरुणीने धावत्या रिक्षामधून अक्षरशः उडी घेतली. तेंव्हा आधी मुलीला मदत करणाऱ्या रिक्षाचालकाने आता हे प्रकरण अंगलट येणार म्हणून घटनास्थळावरून पोबारा केला. परंतु जिन्सी पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी फरार ऑटो रिक्षा चालकाचा शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या.औरंगाबादच्या मोंढा नाका ते आकाशवाणी चौक दरम्यान हि घटना घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली.

सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. परंतु आजूबाजूच्या लोकांनी तत्काळ मुलीकडे धाव घेऊन तिची विचारपूस केली तेंव्हा तिने घडलेला प्रकार सांगितला. तेंव्हा मुलगी जखमी झाली होती. तिने दिलेल्या मोबाईलवर फोन करून एका नागरिकाने तिच्या घरच्यांना घटनास्थळी बोलावले आणि तिला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यास मदत केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!