Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime Update : अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोघांना बेड्या

Spread the love

औरंगाबाद – क्रांतीचौक परिसरातील महसूल प्रबोधिनी समोर असलेल्या इमारतीत क्रांतीचौक पोलिसांनी जादूटोणा करणार्‍या दोघांना दुपारी १वा.धाड टाकून बेड्या ठोकल्या.अशी माहिती पोलिस निरीक्षक डाॅ.गणपत दराडे यांनी दिली.

मोहम्मद नईम मलीक मोह्हमद यामिन (४०) व शहजाद अन्सारी निरास अन्सारी (२६) दोघेही रा.उत्तरप्रदेश मधील मेरठ जिल्ह्यातील इंचोली येथी रहिवासी आहेत. त्यांच्या ताब्यातून लिंबू, सुया, दोरे, गंडे इत्यादी सहित अंदाजे एक लाख रु.जप्त करण्यात आले आहेत. गेल्या एक महिन्यापासून दोघांनी शहरात जादूटोणा सुरु केल्याचे पोलिस तपासात उघंड झाले आहे.

सैतान त्रास, सासु – सुना भांडण, संपत्तीचे वाद,कोर्टकेस, घटस्फोट, संतान प्राॅब्लेम अशा समस्यांवर उपचार करण्यासाठी कन्सलटिंग फीस म्हणून २५०/-रु.घेत असे व पुढच्या उपचारासाठी रक्कम हजारात सांगत असे.
या कारवाईत पोलिस निरीक्षक डाॅ.गणपत दराडे, पीएसआय महादेव गायकवाड,संतोष राऊत, पोलिस कर्मचारी अनंत कुलकर्णी,कृष्णा चौधरी, मंगेश पवार,नरेंद्र गूजर, नसीमखान,यांनी सहभाग घेतला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!