Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : “त्याची ” वेळ आली होती पण “काळ” आला नव्हता , पोलिसांची एंट्री वेळेवर झाली आणि “तो” वाचला…!!

Spread the love

औरंगाबाद – ट्रक ड्रायव्हिंग शिकवणार्‍या तरुणाने  प्रशिक्षणार्थी चालकाच्या बायकोशी जवळीक साधल्याचे  समजताच  प्रशिक्षणार्थी ट्रक ड्रायव्हरने ट्र्क चालविण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या तरुणाचा काटा काढण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेले गावठी  पिस्तूल , जिवंत काडतुसासह हर्सूल पोलिसांनी संध्याकाळी ७वा. अशोकनगरात जप्त करून आरोपीला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. रामचंद्र रमेश जायभाये (३२) रा.कुंभेफळ,  बुलढाणा असे अटक आरोपीचे नाव आहे.


विषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि , रामचंद्र जायभाये याला हडकोमध्ये  राहणारा पाॅलिटेक्निकचा विद्यार्थी  समाधान सुपडू फरकाडे (२१) हा दोन वर्षांपासून ट्रक ड्रायव्हिंग शिकवत होता. दरम्यान ड्रायव्हिंग शिकवतांना फरकाडेने जायभायेच्या पत्नीशी जवळीक साधल्याचे  माहिती अशोकनगरातल्या लोकांकडून आरोपी जायभायेला मिळाली. जायभायेने आपल्यापरीने याची खात्री केल्यावर समाधान फरकाडेचा काटा काढायच्या उद्देशाने फरकाडेला आज बुधवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास अशोकनगरात बोलावून घेतले. दरम्यान हा प्रकार खबर्‍याने हर्सूल पोलिस ठाण्याचे कर्मचारी शिवाजी शिंदे यांना सांगताच त्यांनी पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांना होणार्‍या संभाव्य गुन्ह्याची माहिती दिली.

हि माहिती मिळताच पोलिस निरीक्षक इंगोले यांनी त्वरीत अशोक नगरात पीएसआय खिल्लारे यांच्यासह पथकाला पाठवून आरोपी जायभायेला १३ हजार रुपयांचा  गावठी कट्टा व तीन जिवंत काडतूसासह ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय खिल्लारे करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!