Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यात ८ हजार १५९ नवीन करोनाबाधित , १६५ मृत्यू

Spread the love

मुंबई :  गेल्या २४ तासांत राज्यात ८ हजार १५९ नवीन करोनाबाधित आढळले असून, ७ हजार ८३९ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. याशिवाय राज्यात आज १६५ करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६०,०८,७५० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.३३ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत १,३०,९१८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६०,६८,४३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,३७,७५५ (१३.५४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,५१,५२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,७९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ९४,७४५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात 26 नवे रुग्ण , एक मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात आज 38 जणांना (मनपा 04, ग्रामीण 34) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 43 हजार 329 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 82 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 478 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 275 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (09)
नाशिक रोड परिसर (1), उल्का नगरी (2), ठाकरे नगर (1), गोलटगाव (1), एन बारा, हडको (1), घाटी परिसर (1), अन्य (2)

ग्रामीण (17)
औरंगाबाद (01), गंगापूर (05), कन्नड (01), वैजापूर (09), पैठण (01)

मृत्यू (01)

घाटी (01)
1. 35, पुरूष, पोरगाव, पैठण

आपलं सरकार

Click to listen highlighted text!