Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : मेरे देशमे : अरे रे ..!! हे काय ? तहाणलेल्या पाच वर्षाच्या चिमुकलीचा गेला प्राण तर आजीची शुद्ध गेली…

Spread the love

राणीवाडा : देशाच्या विकासाच्या आणि महासत्ता बनण्याच्या  कितीही वल्गना सत्ताधारी करीत असले तरी भारत नेमका काय आहे ? याची चांगली जाणीव ग्रामीण भागात राहणाऱ्या ग्रामस्थांना चांगली जाणीव आहे . राजस्थानमध्ये आपल्या आजीसोबत नातेवाईकांच्या घरी निघालेल्या एका तहाणलेल्या पाच वर्षीय चिमुकलीचा जीव गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. रस्त्यात रणरणतं ऊन, कच्चा रस्ता आणि पाण्याचा एक थेंबही न मिळाल्याने या चिमुकलीचा जीव गेला तर तिच्या आजीलाही हे ऊन सहन न झाल्यामुळे तिही बेशुद्ध पडली. तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. एएनआय हे वृत्त दिले आहे.

राजस्थानमधल्या जालोर जिल्ह्यातल्या रानीवाडा भागातली ही घटना असून मिळालेल्या माहितीप्रमाणे  एक वृद्ध महिला आपल्या पाच वर्षांच्या नातीसोबत आपल्या नातेवाईकांकडे जायचे  म्हणून पायी निघाली होती. जवळपास १२ किलोमीटरचा रस्ता होता. मात्र, दुपारचे कडक ऊन आणि कच्च्या रस्त्यावर पिण्यासाठी पाण्याचा एक थेंबही न मिळाल्याने या पाच वर्षांच्या मुलीचा करून अंत झाला तर  या वयस्क महिलेलाही उन्हाचा त्रास झाल्याने तीही बेशुद्ध अवस्थेत आहे.

दरम्यान  या दोघींना असे  तापलेल्या जमिनीवर पडलेले  पाहून याच रस्त्यावरून जाणाऱ्या एका युवकाने गावच्या सरपंचांना फोन केला. सरपंच पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले तेंव्हा सदर वृद्ध महिला बेशुद्धावस्थेत होती तर पाच वर्षीय बालिका निपचित पडली होती वृद्धेला रुग्णालयात  उपचारासाठी दाखल कऱण्यातआले . सिरोहीमधल्या रायपूर गावातून ह्य़ा दोघी निघाल्या होत्या. त्या सलग नऊ तास चालत होत्या, त्यांनी सात किलोमीटरचे  अंतर पार केले  होते  मात्र उन्हाचा तडाखा या दोघींनाही सहन झाला नाही .

या महिलेला शुद्ध आल्यावर तिने सांगितले  की, तहानेमुळे दोघीही बेशुद्ध झालो होतो. पण काही वेळाने हलक्या पावसाला सुरुवात झाली आणि त्यामुळे माझा जीव वाचला. लॉकडाऊनमुळे सध्या येण्याजाण्याची कोणतीही सोय नसल्याने रायपूर ते डुंगरी हा २२ किलोमीटरचा प्रवास करण्याऐवजी या महिलेने १५ किलोमीटरचा शॉर्टकट निवडला होता. सकाळी ८ वाजता या दोघींनी चालायला सुरुवात केली. तेव्हा वातावरण थंड होतं, मात्र दुपारपर्यंत पारा ४५ अंशांवर पोहोचला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!