Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : “घोड़ी चढ़ेगा अलखराम” !! उत्तर प्रदेशातील जातीयवादाचा बुरखा फाडणारा हा कोण आहे अलखराम ?

Spread the love

बुंदेलखंड : देशातील जातीव्यवस्था संपली किंवा आता पूर्वीसारखे विषमतेचे दिवस राहिले नाहीत असे म्हटले जात असताना आपल्या अवती- भवती जातीय व्यवस्था जोपासणाऱ्या अनेक घटना घडतात. जसे आजही अनेक गावात ” एक गाव एक पाणवठा ” नाही. मोठी शहरं सोडली तर ग्रामीण भागात आणि लहान शहरात अजूनही वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या स्मशानभूमी आहेत तर अनेक गावात मागास म्हटल्या जाणाऱ्या समाजाला समशानभूमीच नाही. अनेक गावातील हॉटेलांमधून मागास व्यक्तींना वेगळ्या कपातून चहा -पाणी दिले जाते. किंवा शहरात आजही या जातीच्या लोकांना घरे भाड्याने दिली जात नाहीत. तरीही आपण जातीव्यवस्था संपल्याचे म्हणत असतो परंतु बुंदेलखंडच्या एका मागास तरुणाने उत्तर प्रदेशातील जातियवादाची लक्तरे फेसबुकवर टांगली आहेत.


खरे तर हा विषय उत्तर प्रदेशासाठी नवीन नाही . या राज्यातील अनेक गावात मागास तरुणांना गावातून लग्नाची वरात काढण्यास किंवा वरातीत मागास नवरदेवाला घोड्यावरून वरात काढण्यास मज्जाव केला जातो . हि वस्तुस्थिती जगासमोर मांडताना या तरुणाने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे कि, बुंदेलखंड मध्ये असे कुठले राजकीय संघटन आहे का ? कि जे दलितांना वरातीमध्ये घोड़्यावर किंवा मोटारीमध्ये बसण्याचा हक्क मिळवून देतील. विशेष म्हणजे त्याची ही फेसबुक पोस्ट पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला असून स्वतंत्र भारतामध्ये आजही या गावात दलितांना घोड्यावर बसून वरात काढण्यास परवानगी कशी काय नाही? असा सवाल अनेकांनी केला आहे. यावरून आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली असून ट्विटरवर “घोड़ी चढ़ेगा अलखराम” हा ट्रेंड चालू आहे.

१८ तारखेला आहे लग्न, पोलिसांना दिला अर्ज

उत्तर प्रदेशमधील बुंदेलखंडच्या महोबा जिल्ह्यातील माधवगंज या गावातील हा तरुण असून या गावात मागास वाढू वारांना घोड्यावरून, घोडागाडीतून किंवा मोटारीतून लग्नाची वरात काढण्याची परवानगी नाही. या तरुणाचे १८ जून रोजी लग्न आहे. मात्र, लग्नामध्ये घोड्यावरून वरात काढता येणार नाही, या विचाराने हा २२ वर्षीय हा तरुण खूपच चिंतेत आहे. तो कुटुंबीयांकडे हट्ट करून रडत देखील आहे, असे सांगण्यात येत आहे. यासाठी त्यानं अनेक प्रयत्न केल्यानंतर अखेर फेसबुकवर पोस्ट लिहिली असून त्यामध्ये त्याने फेसबुकवर हि पोस्ट लिहिली आहे.

प्रियांका गांधी यांनाही दिले निमंत्रण

या २२ वर्षीय तरुण अलखराम याचे घोड्यावरून वरात काढण्याचे लहानपणापासूनचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो सध्या अनेक प्रयत्न करत आहे. गावातील जातीयवादी, सनातनी तथाकथित सवर्ण लोक गावातून मागास वाढू वारांची वरात काढू देत नाहीत. त्यामुळे अलखरामचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या वडिलांनी महोबकंठ ठाण्यामध्ये विनंती पत्रसुद्धा दिले असून अलखरामने काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनाही आपल्या लग्नाचे निमंत्रण दिले आहे.

याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार दोन हजार लोकसंख्या असलेल्या माधवगंज आवाज स्वातंत्र्यानंतर ७४ वर्षात एकाही मागास जातीतील वराची वरात घोड्यावरून निघालेली नाही. या गावातील जातीयवादी कर्मठ लोक त्यांना घोड्यावर बसून काढण्याची परवानगी कोणत्याही परिस्थितीत देत नाहीत. दरम्यान या गावातील वयोवृद्ध लोकांचे म्हणणं आहे की आम्ही आमच्या आयुष्यात आजपर्यंत कोणत्याच मागासवर्गीय वरची वरात घोड्यावरुन निघाल्याचे पाहिले नाही.

भीम आर्मीचा पुढाकार

या पोस्ट नंतर त्याच्या मदतीला आता भीम आर्मी समोर आली आहे. त्यांनी अलख राम ची वरात घोड्यावरून काढल्याण्याची तयारी सुरू केली आहे. तर भाजपचे आमदार वज्र भूषण राजपूत यांनीही त्याला फोन करून त्याच्याशी चर्चा केली. लग्नामध्ये कोणतीही अडचण येणार नाही याचे आश्वासन दिले. दोघांमधील या चर्चेची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!