Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : कोरोनाचे संक्रमण तुमच्या हातात : विजय राघवन

Spread the love

नवी दिल्ली :  कंन्टेन्मेंट, टेस्टींग आणि ट्रीटमेंटसह देखरेख ठेवून मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्यान  म्हणजेच कोरोनासंबंधी काळजी घेतली तर आपण करोनाची तिसरी लाट रोखू शकतो, त्यामुळे  सर्वांनी नियमांचे  आणि सूचनांचे  पालन केले  तर काही ठिकाणीच करोनाची तिसरी लाट येईल, नाहीतर येणारही नाही, असा दावा  केंद्र सरकारच्या शास्त्रज्ञांच्या गटाचे मुख्य सल्लागार  विजय राघवन यांनी केला आहे.

जगभरात आणि भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवगेळ्या वेळी करोना रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. यामुळे कधी आणि का संसर्ग वाढतो हे समजून घेणेही महत्त्वाचे  आहे. कोरोनाला संधी मिळाली की संसर्ग वाढतो. पण संसर्गाची संधी न मिळाल्यास प्रादुर्भाव वाढणार नाही, असे  राघवन यांनी स्पष्ट केले.

ज्यांनी लस घेतली आहे, मास्क घालत आहेत आणि ते पूर्ण खबरदारी घेत आहेत असे सर्वजण सुरक्षित आहेत. पण व्हायरसला संधी मिळाली तर रुग्ण संख्येत वाढ होणारच. असेही अनेक नागरिक आहेत की जे आधी पूर्ण काळजी घेत होते. पण आता ते निष्काळजी झाले आहेत. अशा परिस्थिती रुग्ण वाढणार. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे  आणि त्याच्या संसर्गाचा वेग कमी करणे  हे आपल्या हातात आहे. लक्षणे  नसलेल्या अनेक नागरिकांमुळे इतरांना संसर्ग होत आहे. यामुळे अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे, असेही  राघवन यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!