Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : देशभरात “म्यूकोरमायसिस” ची दहशत आहे तरी काय ?

Spread the love

नवी दिल्ली – देशात कोरोनाचे तब्बल चार लाख नवे रुग्ण आढळूनआल्याने देशात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे लोकांना आरोग्यविषयक विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशीच धडकी भरवणारी माहिती आता पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोना रुग्णांना एका नव्या आजाराचा सामना करावा लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे योग्य वेळी जर यावर उपचार झाले नाहीत तर रुग्णांना आपले डोळे गमवावे लागत आहेत. “म्यूकोरमायसिस” असे या आजाराचे नाव असून कोरोना रुग्णांमध्ये हे प्रामुख्याने पाहायला मिळत आहे.

तज्ञांच्या मते “म्यूकोरमायसिस” हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचते. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. सूरतमध्ये जीव वाचवण्यासाठी तब्बल 8 रुग्णांचे हे डोळे काढण्यात आले आहेत. गुजरातच्या सूरत शहरात गेल्या 15 दिवसांत अशी 40 प्रकरणे सापडली आहेत. त्यापैकी 8 रुग्णांचे डोळे काढावे लागल्याची घटना समोर आली आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना आता आणखी एका फंगसचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनानंतर आता ‘ब्लॅक फंगस’चा मोठा धोका असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान दिल्लीत ब्लॅक फंगसचा कहर पाहायला मिळत असून त्याचे रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीतील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी कोरोनामुळे “म्यूकोरमायसिस” प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे  म्हटले आहे. म्यूकोरमायसिस हे कोरोनामुळे होणारे एक फंगल संक्रमण आहे. यामध्ये डोळे, गळा आणि नाक यांना इजा पोहोचण्याची अधिक शक्यता आहे. सर गंगाराम रुग्णालयातील वरिष्ठ ईएनटी सर्जन डॉक्टर मनिष मुंजाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला कोरोनानंतर होणाऱ्या फंगल संक्रमणात वाढ होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांत म्यूकोरमायसिस पीडित सहा रुग्ण दाखल झाले आहेत. गेल्या वर्षी या संक्रमणामुळे मृत्यू दरही अधिक होता. यामुळे कित्येक लोकांना अंधत्व आले  होते. तसेच नाक आणी गळ्याचं हाड गळून गेलं होतं.”

एका वेबसाईटच्या वृत्तानुसार रुग्णालयातील ईएनटी विभागाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी “मधुमेह असलेल्या कोरोना रुग्णांवर स्टेरॉईडचा उपयोग काळजीपूर्वक करावा लागतो. कारण त्यामुळे ब्लॅक फंगस होण्याची शक्यता आहे” असे  सांगितले . ब्लॅक फंगसची लक्षण कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. खासकरून मधुमेह, किडनी, हृदयरोग आणि कर्करोगासारख्या आजारांनी पीडित लोकांमध्ये ही समस्या अधिक असल्याचे  देखील त्यांनी म्हटलं आहे. भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. याच दरम्यान चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. अशातच आता या आजाराचा धोका निर्माण झाला असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!