Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : संस्थाचालकाच्या मुलाचे अपहरण ; वीस लाखांची खंडणी मागणारे अटकेत

Spread the love

संस्था चालकाच्या साडेपाच वर्षीय मुलाचे भाडेकरुकडून अपहरण
खब-याच्या मदतीने अपहरणकर्ता पोलिसांच्या जाळ्यात
मोबाइल लोकेशनवरुन रचला सापळा


औरंगाबाद : संस्था चालकाच्या साडेपाच वर्षाच्या मुलाचे भाडेकरुने वीस लाखांसाठी अपहरण केल्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी सकाळी वडगाव कोल्हाटी भागात घडला. पोलिसांनी दिलेल्या मोबाइल लोकेशनवरुन खबरीने संपर्क साधत पैसे देण्याचे सांगून मुलाची अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका केली. संतोष रमेश सनान्से (२९, रा. ऊंडणगाव, ता. सिल्लोड) असे अपहरणकर्त्याचे नाव आहे. त्याच्याविरुध्द एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईचे कौतूक पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांनी केले.वाळूजऔद्योगिक पोलिसांना रिवाॅर्ड देण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांनी दिली.

वडगाव कोल्हाटी येथील पौर्णिमा सोमशेखर हिरेमठ (४२, गट क्र. ११, प्लॉट क्र. ६) या अंबेलोहळ येथील स्व. मधुकरराव देशपांडे शिक्षण संस्था चालवतात. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास वाजता शाळेवर गेल्या होत्या. त्या शाळेत असताना आॅफीस बॉय अमोल जाधव याच्या मोबाइलवर सोमशेखर हिरेमठ यांनी संपर्क साधत मुलगा शौर्य (पाच वर्ष सहा महिने) हा घरात दिसून येत नसल्याचे सांगितले. तेव्हा पौर्णिमा गच्चीवर नाही तर खाली खेळत असेल असे म्हणत फोन ठेवला. मात्र, तोपर्यंत पौर्णिमा यांच्या मोबाइलवर अपहरणकर्ता संतोष सनान्से याचे चार मिसकॉल होते. त्यामुळे पौर्णिमा यांनी सनान्सेच्या मोबाइलवर संपर्क साधला. त्यावेळी त्याने मुलगा शौर्य याचे आपण अपहरण केले असून, त्याची सुटका करण्यासाठी वीस लाख रुपये द्या असे धमकावले. तसेच ही रक्कम एमआयडीसी वाळुजमधील हायटेक कॉलेज जवळ या असेही म्हणाला.

दरम्यान  शौर्यचे अपहरण झाल्याचे कळताच भांबावून गेलेल्या पौर्णिमा यांनी एमआयडीसी वाळुज पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. ही तक्रार पोलिस कर्मचारी नवाब शेख यांनी नोंदवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडली.त्यानंतर सनान्सेच्या मोबाइलचे लोकेशन घेण्यात आले. सनान्सेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी खबरीशी संपर्क साधला. त्यालाच सनान्सेशी बोलण्यास सांगितले. खबरीने सनान्सेला ठरल्यानुसार रक्कम आणून देतो असे सांगितले. त्यावर सनान्सेने आधी माझी माणसं पैसे घेऊन जातील आणि मग प्रताप चौकात मुलगा दिला जाईल असे सांगितले. खबरीने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी दोन्ही ठिकाणी सापळा रचला. त्यानंतर सोमशेखर व खबरी असे हायटेक कॉलेजजवळ थांबले. याचदरम्यान पोलिसांनी खबरीला सनान्सेशी बोलत राहा, म्हणजे त्याचे लोकेशन मिळेल असे सांगितले. त्यानुसार, खबरी त्याच्याशी सलग बोलत राहिला. लोकेशनवरुन सनान्सेच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यानंतर प्रताप चौकातून मुलगा शौर्यला ताब्यात घेण्यात आले.या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त विवेक सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत करंत आहेत.

व्हाईस रेकॉर्डींगवरुन आवाज ओळखला…..

सनान्से हा कर्जबाजारी झाला होता. त्याला पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे त्याने संस्था चालकाच्या मुलाचेच अपहरण करण्याचे ठरवले होते. मात्र, वारंवार एकच मोबाइल क्रमांक आणि आवाजावरुन सनान्से अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला. याशिवाय पौर्णिमा यांनी सनान्सेने केलेला प्रत्येक कॉल रेकॉर्ड करुन ठेवला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!