Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#LIVE | MahanayakCurrentNewsUpdate : दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Live update

Spread the love

केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी. 

 

 • नागपूर – महाल, इतवारी आणि सीताबर्डी बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, नागपूरकरांची बाजारपेठेत खरेदीला मोठी गर्दी, नागपूरमध्ये 15 ते 21 मार्चपर्यंत प्रशासनाने केली कडक लॉकडाऊनची घोषणा.

 • नाशिक जिल्ह्यामध्ये दिवसभरात 1135 नवे रुग्ण ; 456 रुग्णांना डिस्चार्ज ; 8 रुग्णांचा मृत्यू

 

 • पुण्यात दिवसभरात 1805 रुग्णांची वाढ ; 598 रुग्णांना डिस्चार्ज; 13 रुग्णांचा मृत्यू

 

 • नागपूरमध्ये दिवसभरात 1957 नवीन रुग्ण ; 15 रुग्णांचा मृत्यू

 

 • राज्यात आज 15 हजार 817 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, मुंबईतही रुग्णांचा आकडा वाढताच, आज 1 हजार 646 रुग्ण आढळले, मागील 24 तासात 56 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

#MaharashtraCoronaUpdate : राज्यात 24 तासांत चार महिन्यांतले सर्वाधिक कोरोना रुग्ण

 • लातूर जिल्ह्यात 1065 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 66 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 90 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. 419 रॅपीड अॅआन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 62 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 26378 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 932 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 715 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 24731 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 49 आहे.

 

 • अमरावती जिल्ह्यात आज दिवसभरात 448 कोरोना रुग्णांची नोंद. आज 2 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात 41 हजार 731 एकूण रूग्णांची संख्या पोहचली आहे.

 

 • परभणी जिल्ह्यातील कोरोना चा संसर्ग वाढत असल्याने पालकमंत्री नवाब मलिक यांनी दोन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यात घालुन दिलेले विविध निर्बंध 31 मार्चपर्यंत वाढवले आहेत ज्यामध्ये जिल्हाभरातील सर्व धार्मिक स्थळ 31 मार्च पर्यंत बंद असणार आहेत विदर्भातील 11 जिल्ह्यांमधून होणारी वाहतूक ही 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे त्याचप्रमाणे आठवडी बाजार ही 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात आज रात्री बारा वाजल्यापासून सोमवारी म्हणजेच 15 मार्चपर्यंत दोन दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. सार्वजनिक ठिकाणी बाजारपेठा लग्नकार्य या ठिकाणी कोरोनाचे नियम न पाळता लोक गर्दी करत आहेत. त्यामुळे आज रात्री बारापासून शनिवार, रविवार दोन दिवस आणि सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. परभणीकरांना कोरोनावर मात करण्यासाठी नियमाचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे. जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर नाईलाजाने कडक लॉकडाऊन करण्याची वेळ येईल, असेही नमूद केले आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

 • बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता वीकएण्ड लॉकडाऊन अधिक कडक करण्यात आला आहे. जिल्ह्यात आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून सोमवार सकाळी आठ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन असेल. जिल्ह्यात 567 नवीन रुग्ण असून तर सध्या 3469 अॅक्टिव रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गेल्या चोवीस तासात 07 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हे आदेश जारी केले आहेत.

 

 • एमपीएससीची पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा आता 21 मार्चला होणार असून त्या संदर्भातील निवेदन एमपीएससीने जाहीर केले आहे.

 

 • येत्या रविवारपासून तुळजाभवानी मंदिर बंद राहणार आहे.

पुण्यात कोणतेही नवे निर्बंध नाही… जाणून घ्या पुण्यात काय सुरू, काय बंद!

पुण्यात कोणतेही नवे निर्बंध नाही… जाणून घ्या पुण्यात काय सुरू, काय बंद!

#MPSC_EXAM_Date : लोकसेवा आयोगाने परीक्षेची नवीन तारीख केली जाहीर

#MPSC_EXAM_Date : लोकसेवा आयोगाने परीक्षेची नवीन तारीख केली जाहीर

एमपीएससीच्या विषयावर विरोधकांनी राजकारण करायची गरज नव्हती : अजित पवार

एमपीएससीच्या विषयावर विरोधकांनी राजकारण करायची गरज नव्हती : अजित पवार

AurangabadCoronaUpdate : ११ मार्चपासून काय चालू ? काय बंद ? जाणून घ्या सविस्तर बातमी

AurangabadCoronaUpdate : ११ मार्चपासून काय चालू ? काय बंद ? जाणून घ्या सविस्तर बातमी

आपलं सरकार

Click to listen highlighted text!