Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पुण्यात कोणतेही नवे निर्बंध नाही… जाणून घ्या पुण्यात काय सुरू, काय बंद!

Spread the love

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी, पुणेकरांवर कुठलेही नवे निर्बंध न लादण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण वाढवण्यावर आणि आरोग्य व्यवस्था सुधारणेवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संसर्ग सर्वाधिक वेगाने वाढत असल्याने लसीकरणात पुण्याला प्राधान्य मिळावे, अशी मागणी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केली आहे.

आरोग्य विषयातील तज्ज्ञांनीही पुण्यातील 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरण दिल्यास दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी मदत होईल, असा सल्ला दिल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. पुण्यातील कोरोना स्थितीविषयी सकाळी पालकमंत्री अजित पवार, मनपा प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत काऊन्सिल हॉल येथे बैठक झाल्यानंतर सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेऊन पुण्यातील नवे नियम सांगितले ;

पुण्यात काय सुरू काय बंद ?

– पुण्यातील शाळा – महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद राहतील. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थांना यातून सूट.

– हॉटेल्स दहा वाजेपर्यंत सुरु राहतील. तर होम डिलीव्हरी 11 वाजेपर्यंत करता येईल.

– त्याचबरोबर एकुण आसनक्षमतेच्या पन्नास टक्केच लोकांना परवनगी.

– लग्न समारंभ , धार्मिक विधी, कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम , अंत्यविधीप्रसंगी आणि दशक्रियाविधीसाठी फक्त पन्नास (50) लोकांना परवानगी.

– पुण्यातील बाग फक्त सकाळी सुरू राहणार, तर संध्याकाळी बंद राहतील.

– रात्री अकरा ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचार नियंत्रण

– एमपीएससीचे कोचिंग क्लासेस आणि लायब्ररीच्या पन्नास टक्के क्षमतेनुसार विद्यार्थांना वापरता येतील.

– थिएटर, मॉल्स आणि दुकाने दहा वाजेपर्यंत सुरु राहतील. तसेच नियम न पाळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात येणार. 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!